Buldhana News: २५ दिवसांपासून नळाला पाणी नाही; संतप्त महिलांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा

२५ दिवसांपासून नळाला पाणी नाही; संतप्त महिलांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरपांग्रा गावात पाणी प्रश्न पेटला आहे. तब्बल २५ दिवस गावात नळाला पाणी येत नसल्याने महिलांची (Buldhana) पाण्यासाठी मोठी कुचंबणा होत आहे. सातत्याने ग्रामपंचायतकडे (GramPanchayat) पिण्याच्या पाण्यासाठी पाठपुरावा करून देखील ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव गावातील पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी शेकडोच्या संख्येत ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला आहे. (Latest Marathi News)

Buldhana News
St Workers Vetan Karar : एसटी कर्मचारी आक्रमक; आधी विठ्ठलाला साकडं, नंतर CM एकनाथ शिंदेंना घेराव घालणार

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरपांग्रा गावात पाणी प्रश्‍न भेडसावत आहे. महिलांसोबत ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झाले. त्यामुळे मलकापूर पांगरा गावात पाणी प्रश्न (Water Crisis) पेटला आहे. मलकापूर ग्रामपंचायताकडे चार विहिरी असून पाण्याची टाकी सुद्धा आहे. विहिरींना मुबलक पाणी आहे. गावात नळयोजना सुद्धा आहे. मात्र ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांना पणी मिळत नाही. परिणामी महिलांना गावाबाहेरील विहिरीवरून पाणी आणावे लागते. तर चारशे ते पाचशे रुपये देऊन टँकर विकत घ्यावे लागते. ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन ही याकडे दुर्लक्ष होत आहे.

Buldhana News
Shirpur Bribery Trap: कृषी विस्तार अधिकारी आठ हजारांची लाच घेताना ताब्‍यात

आक्रमक आंदोलनाचा इशारा

ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ गावाला पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अन्यथा पुन्हा आक्रमक आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. जोपर्यंत गावात नियमित पाणीपुरवठा होणार नाही; तोपर्यंत मोर्चा मागे घेणार नाही, असा पवित्रा संतप्त महिलांकडून घेतल्याचे पाहायला मिळाले. तर पाणी द्या पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली कारा, या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com