Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, परराज्यात पलायनाचा प्लॅन; जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Jalna Crime News: जालन्यात एका परप्रांतीयानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलीय. परप्रांतीय बांधकाम कामगार असून, त्यानं दोन वेळा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.

Bhagyashree Kamble

जालन्यात एका परप्रांतीयानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलीय. परप्रांतीय बांधकाम कामगार असून, त्यानं दोन वेळा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव येथेही खासगी कोचिंग क्लासच्या संचालकानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. जालन्यात वारंवार या घटना घडत असल्याकारणानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

जालन्यात एका अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. फैजान खान असं आरोपीचं नाव असून, सोनलनगर येथील इमारतीवर आरोपी फरशी बसवण्याचं काम करीत होता. त्याच इमारतीचे वॉचमॅन यांची अल्पवयीन मुलगी इमारतीच्या वरच्या मजल्यावर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती. हीच संधी साधत आरोपी फैजान खान यानं चिमुकलीचा हात धरून बाथरूममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि चिमुकलीवर अत्याचार केला.

या घटनेची माहिती मुलीनं घरच्यांना दिली. बदनामी होऊ नये म्हणून कुटुंबियांनी कुठेही वाच्यता केली नाही. दरम्यान रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नराधमाने पुन्हा मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीनं आरडाओरडा केला. चिमुकलीनं आरडाओरडा केल्यानं आरोपीनं तेथून पळ काढला. त्यानं उत्तर प्रदेशला पलायन करण्याचे ठरवले. मात्र, परराज्यात पलायन करण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपीचे मुसक्या आवळल्या.

याप्रकरणी चिमुकलीच्या नातेवाईकांनी कदीम जालना पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मुलीच्या तक्रारीवरून बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्याबरोबरच ॲट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी फैजानला उत्तर प्रदेशला पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेतलं. या प्रकरणी कदीम जालना पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT