eknath shinde news saam tv
महाराष्ट्र

Lumpy Virus : जालन्यात लम्पी आजाराचे थैमान, शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्तानं लिहिलं पत्र

लम्पी आजाराच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे.

लक्ष्मण सोळुंके

Eknath Shinde News : देशभरात लम्पी आजाराचे थैमान पसरले आहे. हा लम्पी आजार प्रामुख्याने जनावरांना होतो. हा अत्यंत्य संसर्गजन्य असून महाराष्ट्रासहित देशभरात सुमारे हजारो जनावरांचा मृत्यू झाला आहे. या लम्पी आजारामुळे शेतकरी (Farmer) मेटाकुटीला आहे. याच लम्पी आजाराच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पत्र चर्चेत आले आहे.

जालना जिल्ह्यातील कृष्णा एकनाथ खरात या शेतकऱ्याने लम्पी आजाराविषयी मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे. कृष्णा एकनाथ खरात असं या शेतकऱ्याचं नाव असून जालना जिल्ह्यातील रोषणगाव येथील रहिवासी आहे. रोषणगाव परिसरात लम्पी आजारामुळे १६ जनावरं दगावली आहेत. तसेच दोनशेपेक्षा जास्त जनावरांना लम्पी आजारानं ग्रासलं आहे.

मात्र, एका महिन्यांपासून ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी गैरहजर आहे, याची माहिती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळं ग्रामसेवक संघटनांनी शिक्क्यावर बहिष्कार टाकला असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्तानं पत्र लिहिलं आहे.

शेतकरी कृष्णा एकनाथ खरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की,बदनापूर तालुक्यात रोषणगाव परिसरात लम्पी आजार झपाट्याने वाढत आहे. गेल्या दीड महिन्यात अनेक जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. या आजारामुळे १६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अशा स्थितीत गावात ग्रामसेवक नाही'

' ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांनी संगतमताने शिक्क्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे मी थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून ई-मेल केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कृष्णा खरात यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ideal Weight by Age: तुमचं वजन योग्य आहे का? १८ ते ६० वयापर्यंत वयानुसार जाणून घ्या किती असावे वजन

Maharashtra News Live Update: गणेश मंडळ आणि महापालिकेच्या बैठकीत गोंधळ

IAS Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे पोस्टिंग?

Skin Care : सणांच्या घाईत त्वचेसोबत 'ही' चूक होत नाही ना? नॅचरल ग्लो हवा असेल, तर आजपासूनच करा हे ५ बदल

Private Part Hygiene Tips: प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ ५ गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या

SCROLL FOR NEXT