नारायण राणेंच्या वेळी व्यक्तिस्वातंत्र्य विसरलात; शिंदे गटाचे म्हस्के ठाकरे गटावर जोरदार कडाडले

'तुम्ही नारायण राणे यांच्यावेळी व्यक्तिस्वातंत्र्य विसरला होतात, असं प्रत्युत्तर म्हस्के यांनी ठाकरे गटाला दिलं आहे.
uddhav thackeray and narayan rane and naresh mhaske
uddhav thackeray and narayan rane and naresh mhaske saam tv
Published On

Shinde camps News : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ९ ऑक्टोबर रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार टीका केली. ठाकरे गटाच्या आरोपांना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'तुम्ही नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावेळी व्यक्तिस्वातंत्र्य विसरला होतात, असं प्रत्युत्तर म्हस्के यांनी ठाकरे गटाला दिलं आहे.

uddhav thackeray and narayan rane and naresh mhaske
ऋतुजा लटकेंच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह; ठाकरे गटाकडून 'मातोश्री'च्या' विश्वासू नेत्याच्या नावाची चर्चा

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तेव्हा त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक केली होती. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील केला होता. तेव्हा तुमचं व्यक्तिस्वातंत्र्य कुठं होतं? असा सवाल नरेश म्हस्के यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना केला आहे.

नरेश म्हस्के पुढे म्हणाले, 'कालच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान,राष्ट्रपती ज्या महिला आहेत. यांची टिंगल टवाळी केली गेली. महिला राष्ट्रपती यांच्या नावावरून मस्करी करणे, अशी वक्तव्य मेळाव्यात करण्यात आली. तुम्ही नारायण राणे यांच्यावेळी व्यक्तिस्वातंत्र्य विसरला होतात. त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षा अधिक चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात आले. टिंगल टवाळी ठाण्याच्या सभेत नेत्यांनी केली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल केलेले आहेत'.

uddhav thackeray and narayan rane and naresh mhaske
Andheri (East) bypoll: ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्याप मंजूर नाहीच

'ही दिशा आपणच दाखवलेली आहे. या महाराष्ट्राला आपण दाखवलेल्या दिशेनेच आपल्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता आरडाओरड करण्याची गरज नाही, असेही म्हस्के म्हणाले. म्हस्केच्या आरोपांना ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com