Jalna News  Saam tv
महाराष्ट्र

Jalna : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाख रुपयांची खंडणी मागणारे दोघे अटकेत, जालना जिल्ह्यात खळबळ

Jalna News : जालना शहरात हि घटना घडली होती. दरम्यान या घटनेत २९ जून २०२५ रोजी व्यापारी असलेल्या चंदन गोलेच्छा यांना तीन जणांनी पिस्टलचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते.

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. अशातच जालन्यामध्ये बंदुकीचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. 

जालना शहरात हि घटना घडली होती. दरम्यान या घटनेत २९ जून २०२५ रोजी व्यापारी असलेल्या चंदन गोलेच्छा यांना तीन जणांनी पिस्टलचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते. तसेच त्यांच्याजवळ असलेली ४ लाख रुपयांची रक्कम काढून घेतली होती. इतकेच नाही तर आणखी ५० हजार रुपयांची मागणी देखील करण्यात आली होती. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

तिघांपैकी दोन जण ताब्यात 

मात्र फरार आरोपी जालना शहरातील विशाल कॉर्नर येथे थांबलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तीन पैकी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर त्यांच्यातील फरार असलेल्या एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. 

दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

जालना पोलिसांनी केलेल्या कारवाईत ताब्यात घेतलेल्या दोघांकडून १ गावठी पिस्टल, ७७ हजार रुपये रोख, १ मोटार सायकल आणि ३ मोबाईल फोन असा एकुण २ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर या प्रकरणातील अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे आज दुपारी दरे गावात जाणार

Nashik Crime : हाणामारीत जखमी राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल होताच भाजपचे पदाधिकारी फरार

Oil India Recruitment: ऑइल इंडियामध्ये सरकारी नोकरीची संधी अन् १.६० लाख रुपये पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Video Viral: मुंबईकर धन्यवाद!, कामाला जाणाऱ्या तरूणाचं 'ते' कृत्य पाहून मराठा आंदोलनकांनी केलं तोंडभरून कौतुक, VIDEO

Manoj Jarange Patil Protest Live Updates : अजित पवारांच्या विश्वासू शिलेदारांचा जरांगेंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा

SCROLL FOR NEXT