Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

Jalna News : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी गावात अनेक वर्षांपासून सुविधा मिळत नाहीत. मुख्य म्हणजे ग्रामपंचायतीमार्फत गावात पिण्याचे पाणी सोडण्याचे देखील नियोजन व्यवस्थित नाही
Badnapur News
Badnapur NewsSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: गावात आवश्यक असलेल्या सुविधा ग्रामपंचायतींकडून मिळत नाही. गावातील नालेसफाई, कचऱ्याचा प्रश्न त्याचबरोबर नागरिकांची कामे वारंवार सांगूनही होत नाहीत. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. यात आज संतप्त ग्रामस्थांनी गावचे सरपंच व ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडल्याची घटना बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी गावात घडली आहे. यावेळी महिलांनी आपल्या संतप्त भावना देखील व्यक्त केल्या आहेत. 

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी गावात अनेक वर्षांपासून सुविधा मिळत नाहीत. मुख्य म्हणजे ग्रामपंचायतीमार्फत गावात पिण्याचे पाणी सोडण्याचे देखील नियोजन व्यवस्थित नाही. यामुळे गावात पाच- सहा दिवसांनी पाणी मिळत आहे. हि समस्या मागील पाच वर्षांपासून असल्याचे महिलांकडून सांगण्यात येत आहे. परिणामी दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे. 

Badnapur News
Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

नागरी समस्येसाठी ग्रामस्थ आक्रमक
दुधनवाडी गावातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच सांडपाणी निघण्यासाठी देखील नाली नसल्याने पाणी रस्त्यावर येत असते. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रामसेवक गावात कामचं करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केले असून या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. 

Badnapur News
Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

ग्रामपंचायत कार्यालयाला लावले कुलूप 

गावातील नालेसफाई, कचऱ्याचा प्रश्न त्याचबरोबर नागरिकांची कामे वारंवार सांगूनही होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरपंचासह ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवलं आहे. गावातील विविध समस्यांवर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कामं करत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी टोकाचे पाऊल उचलत चक्क ग्रामसेवकासह ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत मध्येच कोंडलय. दरम्यान, जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना सोडणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com