Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

Nashik Bhandara Rainfall News: यंदा चांगला मॉन्सून होत आहे. तसेच मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे देखील अनेक धरणात पाणी साठा वाढला होता. तर आताच्या पावसात धरण फुल्ल भरले असून धरण ओव्हरफ्लो झाले आहे
Nashik Bhandara Rainfall News
Nashik Bhandara Rainfall NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 
नाशिक
: नाशिकच्या सटाण्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस बसरत असल्याने मोसम खोऱ्याला वरदान ठरलेले हरणबारी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. यामुळे मोसम खोऱ्यातील शेतकरी आनंदला आहे. सध्या धरणातून मोसम नदी पात्रात २५०० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मोसम नदी दुथडी वाहू लागली आहे. तसेच अहिल्यानगर व भंडारा जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरु असून भंडारदरा आणि निळवंडे धरणातून विसर्ग वाढवला आहे.

यंदा चांगला मॉन्सून होत आहे. तसेच मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे देखील अनेक धरणात पाणी साठा वाढला होता. तर आताच्या पावसात धरण फुल्ल भरले असून धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मागील वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरण भरून वाहू लागले. मात्र यंदा सुमारे महिनाभर अगोदरच हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण ओसंडून वाहत असल्याने हरणबारी लाभ क्षेत्रातील मोसम, काटवन व करंजाडी खोऱ्यातील नदी काठच्या गावाचा पिण्याचे पाणी शेती सिंचनाचा प्रश्न सुटल्याने शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भंडारदरा आणि निळवंडे धरणातून विसर्ग वाढवला

अकोले (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारदरा धरणातून १० हजार क्युसेक वेगाने पाणी निळवंडे धरणाकडे झेपावले आहे. तर निळवंडे धरणातून पुढे साडेसहा हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडाऱ्यात संततधार सुरु 

भंडाऱ्यात रात्रीपासून सुरू असलेला संततधार पाऊस सकाळीही कोसळत आहे. त्यामुळे भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चुल्हाड ते सुकडी नकुल आणि गोंदे खारी ते टेमनी या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पावसाचे पाणी वाहू लागले. वाहतुकीसाठी हे दोन मार्ग बंद करण्यात आले आहे. तर, तुमसर शहरातील काही सखल भागांमध्येही पावसाचं पाणी साचले आहे. तर, रस्त्यावरही गुडघाभर पाणी असल्याने तिथून मार्गक्रमण करताना वाहन धारकांची चांगलीच कसरत होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com