जालन्यात अज्ञात मुलीशी लग्न लावून फसवणूक; वरपित्यास एक लाख तीस हजाराचा गंडा!  SaamTv
महाराष्ट्र

जालन्यात अज्ञात मुलीशी लग्न लावून फसवणूक; वरपित्यास एक लाख तीस हजाराचा गंडा!

तुमच्या मुलांचं लग्न मी लावून देतो, म्हणत गावातील दलालाने एक लाख तीस हजार घेऊन एका अज्ञात मुलीशी लग्न लावून दिले.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यात मुलांचं लग्न लावून देतो म्हणून वर पित्याला तब्बल एक लाख तीस हजारात चुना लावल्याची घटना घडलीय. या प्रकरणी वरच्या पित्याच्या तक्रारी वरून गोदी पोलिस ठाण्यात फसवणूक (fraud) केल्या प्रकरणी एका दलालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

तीर्थपुरी येथील नामदेव साटवजी जाधव यांच्या मुलांचं लग्न (Marriage) होत नसल्याने, तुमच्या मुलांचं लग्न मी लावून देतो, म्हणत गावातील ओंकार भानुदास कासार यांनी एक लाख तीस हजार घेऊन एका अज्ञात मुलीशी लग्न लावून देत या दलालाने आपला विश्वासघात करून हे लग्न लावून दिल्याची तक्रार नामदेव साटवजी जाधव यांनी गोदी पोलिस (police) ठाण्यात दिली.

त्यावरून गोदी पोलिसांनी दलालाविरुद्ध (broker) फसवणुकीचा गुन्हा (Case) दाखल दाखल करत या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असता, या आरोपी विरोधात लग्न लावून देण्याचं आमिष दाखवल्या प्रकरणी नेवासा पोलिसात गुन्हा दाखल असून त्याला नेवासा पोलिसानी त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी नेवासा (nevasa) पोलिसाच्या ताब्यात असल्यानं अशा प्रकारे किती लोकांची फसवणूक केली याचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT