Ashti Police Station
Ashti Police Station Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: धक्‍कादायक..महिलेवर पतीकडून अत्‍याचार; पत्‍नी देत होती झोपडीबाहेर पहारा

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यात उसाच्या फडा शेजारील खोपीत नवरा एका २१ वर्षीय महिलेवर अत्‍याचार करत (Jalna News) होता. तर त्यांची पत्नी त्याला मदत म्हणून खोपी बाहेर उभी राहून पहारा देत असल्याची धक्कादायक घटना अंबड (Ambad) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. (Latest Marathi News)

जालना शहरातील २१ वर्षीय विवाहित महिला घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण खु. या गावात ऊस तोडणीसाठी ऊस तोड कामगार म्हणून गेली होती. ऊस तोडणी ज्या ठिकाणी सुरू होती. त्याचं उसाच्या थळाजवळ एका खोपीत राम भगवान जाधव आणि त्यांची पत्नी वर्षा राम जाधव हे राहत होते.

महिलेला पत्‍नीनेच पाठविले झोपडीत

ऊस तोडणी सुरू असताना पीडित महिला आणि वर्षा जधाव यांची ओळख झाल्याने शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास वर्षा जाधव हिने त्या ठिकाणी कुणी नसताना पीडित २१ वर्षीय महिलेस (Crime News) आपल्या खोपित पाठवले आणि बाहेरून दार बंद करत दारावर पहारा देत उभी राहिली.

पिडीतेकडून पोलिसात तक्रार

दरम्यान खोपित असलेल्या तिच्या पतीने सदर महिलेसोबत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याचा तक्रार या विवाहितेने अंबड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली. तर बलात्कार झालेली घटना ही आष्टी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येत असल्याने अंबड पोलिसांनी हा गुन्हा आष्टी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी अधिक तपास आष्टी पोलीस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat News: दहावीत मिळवले ९९.७० टक्के गुण, बोर्डातील टॉपर; निकालानंतर चौथ्या दिवशी विद्यार्थिनीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

नवी मुंबई : बनावट नोटांच्या छापखान्यावर पाेलिसांची धाड, 2 लाखांच्या नाेटा जप्त; युवकावर गुन्हा दाखल

Today's Marathi News Live : शेवाळेवाडीत कंटेनरचा अपघात, चालक आणि क्लीनरचा मृत्यू अपघातात मृत

SSC, HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षण मंडळाने दिली अत्यंत महत्वाची माहिती

Hording Collapse : पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्ती केली भीती

SCROLL FOR NEXT