Yashwant Killedar On Aadesh Bandekar: नाटकं पुरे झाली आता चला आव्हान देतो स्वीकारा...; यशवंत किल्लेदारांच आदेश बांदेकरांना ओपन चॅलेंज

Aadesh Bandekar असेल हिंमत तर आव्हान स्वीकारा काय ते एकदाच होऊ दे, असं यशवंतराव किल्लेदारांनी म्हटलं आहे.
Yashwant Killedar VS  Aadesh Bandekar
Yashwant Killedar VS Aadesh BandekarSaam TV
Published On

Yashwant Killedar : मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. सिद्धिविनायक मंदिराबाबत झालेल्या आरोपावर आदेश बांदेकरांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप खेटे असल्याचं सांगत यशवंत किल्लेदारांचा नक्कलधारी असा उल्लेख केला होता. यात आता यशवंतराव किल्लेदार अधिक आक्रमक झाले असून त्यांनी बांदेकरांना ओपन चॅलेंज दिलं आहे. (Latest Marathi News)

" आदेश बांदेकर नाटकं पुरे झाली आता चला आव्हान देतो स्वीकारा. आपणास एक ऑडीओ क्लीप ऐकवतो ते पण सिद्धिविनायक बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये. आपण कसा अध्यक्ष पदाचा वापर करून मोठया देणगीदाराकडून टक्केवारीसाठी कंत्राटे मिळवून देता ते थेट ऐकवतो, असं ट्वीट यशवंतराव किल्लेदारांनी केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये पुढे त्यांनी लिहिलं आहे की, " एक लक्षात ठेवा सिद्धिविनायक मंदीर म्हणजे आदेश बांदेकर नव्हे हे लक्षात ठेवा उगाच तुम्ही केलेल्या पापामध्ये बाप्पाला ओढू नका.अध्यक्ष म्हणजे देवस्थान नव्हे."

Yashwant Killedar VS  Aadesh Bandekar
Yashwant Killedar | 'मुख्यमंत्र्यांना किती अटी घातल्या?' यशवंत किल्लेदार यांचा सवाल

तसेच आव्हान देत त्यांनी यासाठी जागा आणि वेळ देखील सांगितली आहे. " ठीकाण - सिद्धिविनायक बाप्पा मंदीर गाभारा. वेळ - बांदेकर आपण वेळ आणि तारीख द्या मुद्दा नियमबाह्य कामाबाबत आक्षेपाचा आहे तो ही पुरव्यासकट त्यावर बोला. असेल हिंमत तर आव्हान स्वीकारा काय ते एकदाच होऊ दे, असं यशवंतराव किल्लेदारांनी म्हटलं आहे.

आदेश बांदेकरांवर झालेल्या आरोपावर त्यांनी या आधी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, " माझ्यावर आणि श्री सिद्धिविनायकांवर तथ्यहिन आरोप करून जगप्रसिद्ध हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचत सवंग प्रसिद्धिसाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या यशवंत किल्लेदार नामक नक्कलधारी वृत्तीला श्री सिद्धिविनायकांनी खरंच सुबुद्धि द्यावी हिच प्रार्थना. अजूनही मी मर्यादा पाळत आहे." अशात आता यशवंत किल्लेदारांनी केलेलं आव्हान बांदेकर स्विकारणार का हे पाहणं महत्वाचं ठराणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com