JALNA MINOR ABUSE CASE: BLACKMAIL, SEXUAL EXPLOITATION AND FORCED CONVERSION ALLEGATIONS Saam tv
महाराष्ट्र

Jalna : व्हिडिओ, ब्लॅकमेलिंग, अत्याचार, नंतर धर्मांतर; अमरावती, नाशिकनंतर जालन्यात भयंकर कांड

Jalna Crime News : जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर १० वर्षे अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप. आरोपीविरुद्ध पॉक्सो आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर १० वर्षे अत्याचाराचा आरोप

  • फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग

  • धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप

  • आरोपीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू

नाशिकमधील बहुराष्ट्रीय TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण ताजे असतानाच जालना जिल्ह्यात एक धक्कादायक आणि गंभीर प्रकरण समोर आले आहे. अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा तसेच तिला धमकावून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील आरोपी शेख इम्रान शेख हबीब याने सन २०१६ मध्ये ती अल्पवयीन असताना तिचे अंघोळ करतानाचे आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर या फोटोच्या आधारे आरोपीने ब्लॅकमेलिंग सुरू केली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर दबाव टाकला आणि विविध ठिकाणी वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वालसावंगी, जालना आणि संभाजीनगर येथे हा प्रकार अनेक वेळा घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, हा छळ जवळपास दहा वर्षे सुरू होता. बदनामीची भीती आणि धमक्यांमुळे पीडित तरुणी दीर्घकाळ गप्प राहिली. मात्र, मानसिक आणि शारीरिक त्रास असह्य झाल्यानंतर तिने अखेर धैर्य एकवटून पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे आरोपीने पीडितेवर धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. तिला हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न झाला.

तिच्या दैनंदिन आयुष्यावर नियंत्रण ठेवत कपड्यांपासून ते नमाज पठणापर्यंत सक्ती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच कुराण वाचण्यासाठीही दबाव आणण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या तक्रारीनंतर पारध पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी शेख इम्रान शेख हबीब याच्यासह त्याला मदत केल्याच्या आरोपाखाली त्याच्या आई-वडिलांसह एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात पॉक्सो कायदा, जीवे मारण्याची धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलमे लागू करण्यात आली आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींना अटक करण्यासाठी पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT