JALNA BIKE ACCIDENT THREE DEAD IN HEAD ON COLLISION BHOKARDAN Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : जालन्यात अपघाताचा थरार, दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Jalna Accident News : जालन्यातील भोकरदन तालुक्यात दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. नळणी-राजूर मार्गावर भीषण अपघात.

Alisha Khedekar

  • जालना जिल्ह्यात भीषण दुचाकी अपघात

  • समोरासमोर धडकेत तिघांचा मृत्यू

  • एकजण गंभीर जखमी, उपचार सुरू

  • नळणी-राजूर मार्गावर घटना, पोलिसांचा तपास सुरू

अक्षय पाटील, जालना

Jalna Accident 3 Dead News जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सोमवारी रात्री भीषण अपघात घडला आहे. दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी रुग्णावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भोकरदन तालुक्यातील नळणी-राजूर मार्गावर रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली. नळणी येथील सुभाष साठे (वय ४०) आणि विकास साहेबराव साठे (वय ३८) हे दोघे चुलत भाऊ आपल्या दुचाकीने राजूरहून नळणीकडे परत येत होते. दरम्यान, त्यांच्या गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची जोरदार धडक झाली.

समोरच्या दुचाकीवर बरंजळा साबळे येथील अनिल संतोष बोराडे (वय २०) आणि समाधान सर्जेराव कोरके (वय २२) हे दोघे नळणीमार्गे राजूरकडे जात होते. दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर झाल्याने अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात सुभाष साठे, विकास साठे आणि अनिल बोराडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

समाधान कोरके हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

या अपघातामुळे नळणी आणि परिसरात शोककळा पसरली असून विशेषतः एकाच कुटुंबातील दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात टेम्पो ट्रँव्हलर बसचा अपघात

Summer Sharbat Recipe : नारळ पाणीला टक्कर; उन्हाळ्यात प्या 'या' फळाचे थंडगार सरबत, वाचा सोपी रेसिपी

Weekly Horoscope: या राशींना आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगार ४ पटीने वाढणार? बेसिक सॅलरी इतकी होणार; वाचा कॅल्क्युलेशन

Nauvari Saree Blouse Designs : घरंदाज अन् शालीन लूक हवाय? नऊवारी साडीवर शिवा 'या' पॅटर्नचं ब्लाउज

SCROLL FOR NEXT