Shocking : मिस कॉलनं सुरू झाली लव्हस्टोरी; ५ मुलांच्या आईने थेट १९ वर्षांच्या तरुणासोबत थाटला संसार

Bihar Viral Love Story News : मिस कॉलमधून सुरू झालेली ओळख प्रेमात बदलली आणि अखेर लग्नापर्यंत पोहोचली. पाच मुलांची आई असलेल्या ३६ वर्षीय महिलेने १९ वर्षीय तरुणासोबत मंदिरात लग्न केल्याची घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
MISSED CALL LOVE STORY: MOTHER OF FIVE MARRIES 19-YEAR-OLD YOUTH AFTER TWO-YEAR ROMANCE
MISSED CALL LOVE STORY: MOTHER OF FIVE MARRIES 19-YEAR-OLD YOUTH AFTER TWO-YEAR ROMANCESaam tv
Published On
Summary
  • एका मिस कॉलमुळे जुळली लग्नाची गाठ

  • दोन वर्षांनंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले

  • पाच मुलांची आई महिलेने तरुणाशी मंदिरात लग्न केले

  • लग्नानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एका फोन कॉलमुळे इकडचं जग तिकडे होतं असं आपण नेहमी ऐकतं आलो आहोत. कधी कधी चुकीचं कनेक्शन लागतं किंवा मग घाईगडबडीत चुकून कोणत्यातरी नंबरवर कॉल लागतो यामुळे आपली चीडचीड होते. मात्र या चुकीच्या कॉल कनेक्शनमुळे एका प्रेमप्रकरणाची सुरुवात झाली आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरुई बरियारपूर गावातील ही घटना. ५ मुलांची आई असलेल्या एका महिलेने चुकून एका तरुणाचा कॉल उचलला आणि विषय थेट लग्नापर्यंत पोचला.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णिया येथील रहिवासी ३६ वर्षीय बिंदू देवी उर्फ सीमा परवीनची सुमारे दोन वर्षांपूर्वी खरुई बरियारपूर येथील १९ वर्षीय महावीर ठाकूरशी मिस कॉलमुळे ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये वरवरचं बोलणं सुरू होतं. मात्र कालांतराने त्यांच्या संवादात वाढ झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांनीही कुटुंबीयांना न सांगता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

MISSED CALL LOVE STORY: MOTHER OF FIVE MARRIES 19-YEAR-OLD YOUTH AFTER TWO-YEAR ROMANCE
Dadar Accident : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची वाहनांना धडक, २ जणांचा जागीच मृत्यू, १३ गंभीर

बिंदू देवी उर्फ सीमा परवीनचं यापूर्वी लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून तिला ५ मुलं होती. असं असतानाही सीमाने हा निर्णय घेतला. त्यानंतर दोघे कोलकाता येथे गेल्यानंतर त्यांनी मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी एक व्हिडिओही सोशल मीडियावर टाकला असून त्यात एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली.

MISSED CALL LOVE STORY: MOTHER OF FIVE MARRIES 19-YEAR-OLD YOUTH AFTER TWO-YEAR ROMANCE
Flight Service Closed : प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा पुढील ३ महिन्यांसाठी बंद राहणार

दरम्यान, गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. चौकशीदरम्यान दोघेही सज्ञान असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वतःच्या इच्छेने एकत्र राहत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे चौकशी पूर्ण करून त्यांना सोडून देण्यात आले. मात्र एका मिस कॉलने जुळलेल्या या अनोख्या प्रेमप्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com