मुलगी मंत्री, मुलगा आमदार अन् वडील खासदार; मला तोच न्याय का नाही? भुजबळांचा रोख कुणाकडे?

Chhagan Bhujbal latest statement : राज्यसभा उमेदवारीच्या चर्चेदरम्यान छगन भुजबळ यांनी ‘दुसऱ्यांच्या मुलांना लावलेला न्याय मलाही लावा’ असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कुणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Chhagan Bhujbal, Sunil Tatkare, NCP Politics : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी छगन भुजबळ यांनी घातलेली अट दिल्ली भाजप श्रेष्ठींनी फेटाळून लावल्यामुळे हे नाराजी नाट्य रंगल्याचं बोललं जातंय. मात्र उमेदवारीला भाजपनं नकार दिल्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. दुसऱ्यांच्या मुलांना लावलेला न्याय मलाही लावा असंही त्यांनी म्हटलंय. भुजबळांच्या या विधानानंतर पक्षांतर्गत राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वक्तव्याचा रोख थेट सुनील तटकरे यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com