Nimbadevi Dam Saam tv
महाराष्ट्र

Nimbadevi Dam : सातपुड्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना बंदी; दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे सातपुडा पर्वत रांगेत निसर्गरम्य ठिकाणी आहे. जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी निंबादेवी धरण हे गेल्या काही वर्षांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले आहे

Rajesh Sonwane

जळगाव : यावल तालुक्यातील सातपुड्यातील निंबादेवी धरण या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात या धरणात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुढील काही दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असून पुढील आदेश निघेपर्यंत बंदी असणार आहे. 

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे सातपुडा पर्वत रांगेत निसर्गरम्य ठिकाणी आहे. जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी निंबादेवी धरण हे गेल्या काही वर्षांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. यंदा जोरदार पावसामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे या धरणाच्या सांडव्यावरील (Yawal) पायऱ्यांवरून पाणी वाहत असल्याने या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. मागील दोन वर्षांपासून हे धरण अधिक प्रसिद्धीस आले आहे. 

अखेर पर्यटनासाठी बंदी 

सुटीचा दिवस असल्यास सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. जवळच असलेल्या मनुदेवीच्या धबधबा पाहून झाल्यानंतर अनेकजण निंबादेवी येथे येत असतात. मात्र मागील आठवड्यात या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जिल्हा प्रशासनाने या धरणावर पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT