Jalgaon Crime News AI Image
महाराष्ट्र

Shocking : स्पा सेंटरच्या बंद दाराआड नको ते धंदे, पश्चिम बंगालच्या ६ महिला रंगेहाथ सापडल्या; पोलिसांनी दार उघडलं अन्...

Jalgaon Spa Centre Sex Racket Busted: जळगावमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. सहा महिलांची सुटका करण्यात आली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • जळगावमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा

  • स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय

  • कारवाईदरम्यान सहा महिलांची सुटका

  • स्पा चालक आणि जागामालका विरोधात गुन्हा दाखल

महिलांनो तुम्ही बॉडी मसाज करून घेण्यासाठी वेगवगळ्या स्पा सेंटरमध्ये जात असाल तर आताच सावध व्हा! कारण या स्पा सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू आहेत. अशीच एक घटना जळगाव शहराच्या रिंगरोडवरील ख्वॉजामिया चौक परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी स्पाचालक आणि जागामालक अशा दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून ६ महिलांची सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या रिंगरोडवरील ख्वॉजामिया चौकात मसाज देण्याच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित स्पा सेंटरवर कारवाई केली. छाप्यावेळी तेथे मसाज थेरपिस्ट म्हणून काम करणाऱ्या सहा महिला आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका करून पुढील चौकशी सुरू केली आहे.

सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील २६ वर्षीय महिला, मणिपूरमधील ३१ आणि ३७ वर्षीय दोन महिला, पूर्व सिक्कीममधील ३० आणि ३१ वर्षीय दोन महिला तसेच नेपाळमधील बांके जिल्ह्यातील २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिलांना नेमक्या कोणत्या परिस्थितीत जळगावात आणण्यात आले आणि त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचे काम करून घेतले जात होते, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, नेपाळमधील महिलेच्या पासपोर्ट, व्हिसा तसेच भारतात प्रवेश आणि सीमापार प्रवासाच्या पार्श्वभूमीची पोलिसांकडून सविस्तर पडताळणी सुरू आहे. महिलांना इतर राज्ये आणि परदेशातून आणण्यात आले होते का, याचाही तपास केला जात आहे.

या प्रकरणी स्पा सेंटरचा चालक संशयित निरजसिंग पांड्या आणि जागामालक संशयित राजेंद्र पुंडलीक चव्हाण यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पाच्या आडून हा व्यवसाय किती दिवसांपासून सुरू होता, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि महिलांना कोणत्या माध्यमातून येथे आणण्यात आले, याबाबत पोलिस तपास सुरू असून, पुढील तपासात या प्रकरणातील अधिक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मासिक पेन्शनबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Ladki Bahin Yojana : सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”; पुरंदरच्या पाहणी दौऱ्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Palak Besan Chilla Recipe: रोज सकाळी नाश्त्यासाठी बनवा हेल्दी पालक बेसन चीला, वाचा सोपी रेसिपी

Health Tips: बर्फ खाण्याची इच्छा ते हात-पायांना सतत मुंग्या येतात? मग, शरीराचे 'हे' ७ संकेत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT