Mid Day
महाराष्ट्र

Jalgaon Politics: गिरीश महाजन, सेवानिवृत्ती घ्या! नाहीतर...; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर इशारा

Jalgaon Politics: गिरीश महाजन तुम्हाला मतदार संघाच्या लोकांनी धडा शिकवला आहे. गिरीश महाजन तुम्हाला मतदारसंघातील नागरिकांनी तीस वर्ष निवडून दिले. तरी तुम्ही न्याय मिळवून दिला नाही, असं उन्मेश पाटील महाजन यांना इशारा देतांना म्हणालेत.

Bharat Jadhav

संजय महाजन , साम प्रतिनिधी

भाजपचे संकटमोचक म्हणवणारे गिरीश महाजन सध्या संकटात आलेत. एकाबाजुला महाजन यांना रोखण्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेत. तर दुसऱ्या बाजुला ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी गिरीश महाजन यांना गंभीर इशारा दिलाय. तुम्ही स्वता सेवानिवृत्ती घेतली नाही तर तुम्हाला थांबवल्याशिवाय राहणार नाही. असा थेट इशारा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिलाय. दोन तीन दिवसांपूर्वी गिरीश महाजन जामनेर तालुक्यातील लिहा तांडा या गावी कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी या गावातील रस्त्यांची स्थिती फारच बिकट होती.

यावरुनच गिरीश महाजन यांना गावातील स्थानिक तरुणांनी जाब विचारला. तरुणांचा हा आक्रमकपणा पाहून गिरीश महाजनांनी काही उत्तर न देता दुचाकीवर बसून तेथून निघून गेले होते. त्यावरून ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी महाजनांना घेरलंय.

साम टीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यांनी गिरीश महाजन यांना निवृत्ती घेण्याचा सल्ला देत इशारा दिलाय. गिरीश महाजन तुम्हाला मतदार संघाच्या लोकांनी धडा शिकवला. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. गिरीश महाजन तुम्हाला मतदारसंघातील नागरिकांनी तीस वर्ष निवडून दिले. तुम्हाला दोन वेळा मंत्री दिल ग्रामविकास सारखं खातं तुम्हाला मिळालं आहे.

गिरीश महाजन तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर आता तुम्ही थांबले पाहिजे.महाजन तुम्ही स्वत: सेवानिवृत्ती घेतली नाही तर तुम्हाला थांबवल्याशिवाय राहणार नाही, इशारा उन्मेश पाटील यांनी दिलाय. पुढे बोलतांना पाटील यांनी महाजन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. नाशिक कुंभमध्ये भ्रष्टाचार केलाय. गोदरी बंजारा समाजाचा कुंभ यातही तुम्ही भ्रष्टाचार केला, असा आरोप पाटील यांनी केलाय.

गिरीश महाजन यांचं व्हायरलवर स्पष्टीकरण

जामनेर तालुक्यातील लिहा तांडा गावातील रस्त्याच्याविषयी माझी क्लिप व्हायरल करण्यात आली. यात विरोधकांचे राजकारण आहे. लिहा तांडा गावात पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचल्याने चिखल झाला होता. मात्र या गावाच्या विकासासाठी आणि रस्त्यासाठी निधी अगोदरच मंजूर करण्यात आलाय. लवकरच हे काम होतील.

मात्र विरोधक याबाबत राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे गावामधील अनेक कार्यकर्ते हे पूर्वी पासूनच भाजपाचे कार्यकर्ते राहिलेत. ते आजही आपल्या सोबत आहेत, कोणताही गोंधळ झाला नाही, असं महाजन यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय.

शरद पवारांनी गिरीश महाजनांना रोखण्यासाठी मोहरा शोधला

विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरुवात केलीय. स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले असून ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. सध्या ते भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीविरोधात डावपेच आखत आहेत.

शरद पवार यांनी भाजपचे नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी तगडा उमेदवार शोधलाय. भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा धक्कादायक परिणाम नक्की वाचा

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

SCROLL FOR NEXT