पारोळा (जळगाव) : ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चार कामांची वर्कऑर्डर काढून देण्यासाठी एक लाख ८० हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती. पारोळा पंचायत समितीचे कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारीस एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
पारोळा तालुक्यातील एका ग्रामपंचायतींतर्गत (Gram Panchayat) महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून काँक्रिट व पेव्हर ब्लॉक बसविण्याची चार कामे ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या मुलाला मिळाली होती. या चार कामांची वर्कऑर्डर मिळवून देण्यासाठी विस्तार अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांसह सहाय्यक अशी मिळून एक लाख ८० हजार रुपये इतक्या रक्कमेची मागणी केली. याबाबतर तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचत प्रतिबंधक विभागाला (Jalgaon ACB) कळविल्यानंतर पथकाने सापळा रचला.
तक्रार आल्यानंतर २० सप्टेंबरला कल्पेश बेलदार याला एक लाख रुपये रोख स्वीकारताना पथकाने (Bribe) रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर ही रक्कम घेण्यासाठी मला विस्ताराधिकारी सुनील पाटील यांनी सांगितले होते, असा जबाब दिल्यावरून सुनील पाटील व कल्पेश बेलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.