Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Senior Woman Officer Molested Beed: बीड जिल्हा परिषदेमधील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल. कार्यालयात जाऊन धमकी आणि अशोभनीय वर्तन. आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा.
SENIOR FEMALE OFFICER MOLESTED IN BEED ZILLA PARISHAD
SENIOR FEMALE OFFICER MOLESTED IN BEED ZILLA PARISHADSaam TV News
Published On

बीडमध्ये अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधून आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर विनयभंगाचा प्रकार घडला. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सादेक इनामदार असे आरोपी सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून, तो थेट अधिकाऱ्याच्या दालनात गेला. दालनात महिला अधिकाऱ्याशी उद्धटपणे बोलू लागला. तसेच धमकी देत अशोभनीय वर्तन केले. या प्रकारामुळे संबंधित महिला अधिकाऱ्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले.

SENIOR FEMALE OFFICER MOLESTED IN BEED ZILLA PARISHAD
कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

बीडच्या शिक्षण संकुलनात अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंकिग छळ

बीडच्या उमाकिरण शिक्षण संकुलनात एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंकिग छळ करण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर बीडमध्येच नव्हे तर, राज्यात संतापाची लाट उसळली. आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांनी आणखीन किती अल्पवयीन मुलींचे लैंगित शोषण केलं आहे, याचा तपास सुरू आहे. अशा प्रकारची घटना कोणत्याही मुलीवर घडली असेल तर, त्यांनी घाबरून न जाता समोर यावे, तसेच तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

SENIOR FEMALE OFFICER MOLESTED IN BEED ZILLA PARISHAD
बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com