Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Pune News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर असून बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण, हॉस्पिटल पाहणी व विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यानिमित्त पुण्यात दुपारी १२ ते ५ पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
Pune Traffic Changes : पुण्यातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते? वाचा
Pune Traffic Changes newsSaam Tv
Published On

केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा आज पुणे दौरा असून पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वरुढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच आज पुण्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना देखील शहा यांची उपस्थिती असणार आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुण्यातील वाहतुकीत बदल असणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आज मंत्री अमित शहा पुण्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. यादरम्यान दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा-खडी मशिन चौक ते कात्रज चौक यादरम्यान सर्व मालवाहतूक करणाऱ्या जड, अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बंडगार्डन वाहतूक विभागातील मोर ओढा- सर्किट हाउस चौक ते आयबी चौक दरम्यानची एकेरी वाहतूक आवश्यकतेनुसार दुतर्फा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांनी दिली.

Pune Traffic Changes : पुण्यातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते? वाचा
Pune Mahanagpalika Bharti: खुशखबर! पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पुणे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त यांनी काढला आहे. पुण्यातील महत्त्वाच्या कार्यक्रमानंतर मंत्री अमित शहा सायंकाळी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

Pune Traffic Changes : पुण्यातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते? वाचा
Pune : पुणेकरांसाठी खूशखबर! ४ धरणांमध्ये ४५ टक्के साठा| VIDEO

कोणत्या कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार ?

आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा असून राष्ट्रीय छात्र प्रबोधिनीच्या (एनडीए) आवारातील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कोंढवा बुद्रूक येथील जयराज स्पोर्टस कन्व्हेंशन सेंटरचे उद्धघाटन केल्यानंतर कोंढव्यात खडी मशीन चौकाजवळ उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब देवरस रुग्णालयाच्या कामाची पाहणी शहा करणार आहेत. तसेच वडाची वाडी रस्त्यावरील पूना हॉस्पिटलच्या रिसर्च सेंटरच्या ‘लाईफ स्पेस’ भूमिपूजन शहा यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com