Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: दिवाळीच्या सुटीत परिवार बाहेर; बंद घरातुन एक लाखाच्या दागिन्यांची चोरी

Parola News : घरातील सर्व जण १८ नोव्हेंबरला घराला कुलूप लावून कामानिमित्त अमळनेर येथे गेले होते

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : ग्रामीण भागात देखील चोरटयांनी मोर्चा वळविला आहे. कामानिमित्ताने काही वेळाकरिता (Jalgaon) बाहेर गेले असता घराला कुलूप लावले. हीच संधी साधून चोरट्यांनी तब्बल एक लाख रुपयांचे दागिने चोरून नेने. सदरची घटना शेळावे बुद्रूक (ता. पारोळा) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी (Police) पोलिसांत अज्ञात चोरट्‍यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Tajya Batmya)

पारोळा तालुक्यातील शेळावे बुद्रूक येथील किरण बिऱ्हाडे यांच्या घरी दिवाळीनिमित्त नातेवाईक आले होते. या दरम्यान त्यांनी घरातील भिंतीवर एका पर्समध्ये कानातले टोंगल, अंगठ्या आदी सुमारे एक लाख रुपये सोन्याचे दागिने ठेवलेले होते. घरातील सर्व जण १८ नोव्हेंबरला घराला कुलूप लावून कामानिमित्त अमळनेर येथे गेले होते. त्यांच्या मागे घर बंद असल्याचा फायदा घेऊन दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला व घरातील (Theft) दागिण्यांची पर्स चोरुन नेली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सायंकाळी परतल्यानंतर बसला धक्का 

अमळनेर येथे गेलेले बिऱ्हाडे कुटुंबीय सायंकाळी चारला घरी परतले. यावेळी त्यांना घरातील दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी २३ नोव्हेंबरला पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT