Pachora Crime Saam tv
महाराष्ट्र

Pachora Crime : दोन महिन्यांपूर्वी वाद; मध्यरात्री रस्त्यावर अडवत तरुणाची हत्या

Jalgaon News : मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रम आटोपून हेमंत घरी जाण्यासाठी निघाला हेमंतला अडविले भांडणाचा जाब विचारत वाद घातला

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून बदल घेण्याच्या भावनेतून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना पाचोरा शहरात घडली आहे. जुन्या किरकोळ वादातून चाकूने भोसकून खून करण्यात आला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेबाबत पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

पाचोरा शहरातील महात्मा फुलेनगरातील हेमंत सोनवणे (वय २२) असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणार रोहित लोणारी याच्याशी हेमंतचा दोन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्या वेळी लोणारीने त्याला ठार करण्याची धमकी दिली होती. दरम्यान मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादनाचा कार्यक्रम आटोपून हेमंत घरी जाण्यासाठी निघाला. 

वाद घालत केला वार 

यावेळी रोहित लोणारीने हेमंतला अडविले व जुन्या भांडणाचा जाब विचारत त्याच्याशी वाद घातला. यातच कंबरेला खोचलेला चाकू काढून हेमंतच्या पोटावर वार केला. त्यामुळे हेमंत रक्तबंबाळ झाला. त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून जळगाव शासकीय रुग्णालयात रवाना केले. तेथे डॉक्टरांनी तपासून हेमंतला मृत घोषित केले. घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. 

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी शहरात गस्त वाढविली होती. तसेच पोलिसांनी मध्यरात्रीच तपासाची चक्र फिरवत संशयित मारेकरी रोहित लोणारी याला अवघ्या अर्ध्या तासातच पोलिसांनी ताब्यात घेतले. हेमंत सोनवणे याचे आजोबा कमलाकर महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहित लोणारीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक अशोक पवार तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT