जळगाव : उसनवारीने घेतलेले पैसे मागून देखील देत नसल्याने यातून मित्रांमध्ये वाद उद्भवला होता. या वादातून मित्रानेच विळ्याने वार करत मित्राची हत्या केल्याची घटना जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात घडली आहे. घटनेनंतर वार करणारा तरुण स्वतःहून पोलिसांत जमा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील भादली येथील मोहीत सुनील चौधरी (वय २४) आणि अयोध्यानगर हनुमान मंदिर परिसरात राहणार धिरज पाटील हे सोबत खासगी कंपनीत कामाला होते. दरम्यान धिरजने मोहीतकडून पाच हजार रुपये उसनवारीने घेतले होते. यातील चार हजार परत दिले होते. मात्र, उर्वरित एक हजार रुपये घेण्यासाठी मोहितने धीरजकडे तगादा लावला होता. दरम्यान १९ फेब्रुवारीला मोहित कंपनीजवळ पोहोचला असता धिरजने त्याला फोन करून पैसे घेण्यासाठी बोलावले.
वादातून विळ्याने केला हल्ला
मोहित धीरजच्या घरी गेला असताना दोघांमध्ये पैशावरून वाद झाला. मोहितने मित्राच्या नात्याने त्याच्या डोक्यावर टपली मारली. मात्र यातून वाद अधिक वाढल्याने नंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. यातच धिरजने किचन ओट्यावर पडलेला विळा उचलून मोहीतवर उगारला. धारदार विळा त्याच्या पोटात शिरला. पोटाला मोठा वार झाल्याने दोघांमध्ये झटापट होऊन पुन्हा दुसरा वार झाल्याने जखमी मोहितने जीव वाचविण्यासाठी स्वतःला बाथरुममध्ये कोंडून घेतले. तर धिरज घर बंद करून पळून गेला .
पश्चातापात पोलिसांना फोन
मित्र मोहितवर विळ्याने वार करून त्याला जखमी अवस्थेत सोडून धीरजने पळ काढला. मात्र, त्याने परिचयातील पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने त्याला पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.