Suicide Saam tv
महाराष्ट्र

सुसाईड नोटमधून आई– वडीलांचे आभार मानत तरुणाची आत्‍महत्‍या

सुसाईड नोटमधून आई– वडीलांचे आभार मानत तरुणाची आत्‍महत्‍या

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बहिणीकडे राहत असलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. एमपीएसी परीक्षेत कमी मार्क मिळाल्‍याने नैराश्‍ये असलेल्‍या महेंद्र पाटील याने सुसाईड नोटमध्‍ये आई– वडीलांचे आभार मानत जीवनयात्रा संपविली. सदर घटना (Jalgaon) जळगावातील आहुजानगर परिसरात समोर आली आहे. (jalgaon news Young man commits suicide by thanking parents for suicide note)

अमळनेर (Amalner) तालुक्यातील आनोरे गावातील रहिवासी महेंद्र देवीदास पाटील (वय २२) हा जानेवारी महिन्यात जळगाव शहरातील आहुजानगरात वास्‍तव्‍यास असलेली बहिण भारती हरेंद्र पाटील यांच्याकडे राहायला आला होता. तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. पीएसआय बनण्याचे त्याचे स्वप्न होते. काही दिवसांपूर्वी त्याने गृप डी अंतर्गत एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यात त्याला कमी मार्क पडले होते. शिवाय राज्‍यसेवेच्‍या जागांची जाहिरात नुकताच प्रसिद्ध झाली असता त्‍यात कमी जागा असल्‍याने महेंद्र हा नैराश्‍येत असल्‍याची माहिती त्‍याच्‍या मेव्हण्यांनी दिली आहे. तर मृत्यूपूर्वी महेंद्र याने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नुकत्याच झालेल्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने आत्महत्या (Suicide) करत असल्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बहिण व मेव्हने लग्‍नासाठी बाहेरगावी

महेंद्र याची बहिण व मेव्हणे २२ मे रोजी आनोरे गावात लग्नाला गेले होते. यावेळी महेंद्र हा घरी एकटाच होता. महेंद्र यास त्याची बहिण भारती यांनी मंगळवारी फोन केला. मात्र बिझी असल्याने संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे भारती ह्या बुधवारी सुध्दा सकाळपासून महेंद्र यास कॉल करत होते. मात्र फोन न लागल्‍याने भारती यांनी त्यांचे शेजारी यांना खात्री करण्यास सांगितले. शेजारी घरी गेले असता दरवाजा आतून लावलेला होता. दरवाजा ठोठावून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर शेजारच्यांनी पोलिसांशी (Police) संपर्क केला. माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरिक्षक नयन पाटील, सतीश हाळनोर, अनिल मोरे, संजय भालेराव यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी शेवटच्या बेडरूममधील खिडकीचे लॉक तोडले असता महेंद्र गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरवाज्याचे लॉक तोडून मृतदेह बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

आई– वडील देवासारखे

महेंद्रने आत्‍महत्‍या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. सदर चिठ्ठी पोलिसांनी गळफास घेतला तेथून जप्त केली आहे. यात आई– वडील देवासारखे आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले. जीवन अनमोल आहे, माझा गोल वेगळा आहे, पण माझ्यासोबत अशी परिस्थिती निर्माण झाली. एमपीएसीच्या परीक्षेत मला कमी मार्क पडले. त्यामूळे मला हा निर्णय घ्यावा लागत असल्‍याचा मजकूर चिठ्ठीत लिहून शेवटी महेंद्रने आई वडिलांचे आभार मानत आत्‍महत्‍या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT