रिक्षाचालकाने बनविली रेल्‍वे; छंदातून झाली निर्मिती

रिक्षाचालकाने बनविली रेल्‍वे; छंदातून झाली निर्मिती
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी रिक्षा चालविण्याचे काम चालते. परंतु, आवड व छंद माणसाला शांत बसू देत नाही. मग तो छंद कोणताही असू शकतो. यातून केवळ आनंद मिळतो तेवढेच. कुठलेही व्यावसायिक प्रशिक्षण नसताना रिक्षा चालकाने रेल्‍वे (Railway) साकारली आहे. घरात पडलेल्या टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक अशा टिकाऊ वस्तू बनवितांना रेल्वेची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. (jalgaon news pachora Railway built by autorickshaw driver Hobby produced)

Jalgaon News
इंजिनिअर तरुणाने केली स्वखर्चाने बोअरवेल; पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार

अनेकांना लहानपणापासून कुठल्या ना कुठल्या (Jalgaon News) गोष्टींची आवड, छंद असतो. आजच्या धावपळीत जगातही अनेक आपले आवड आणि छंद जोपसतांना आपल्याला पहायला मिळते. याचप्रकारे पाचोरा (Pachora) शहरातील रिक्षाचालक लखन पुंडलिक सोनवणे यांनी छंद जोपासला आहे. लखन सोनवणे हे दिवसभर प्रवासी वाहतूक रिक्षा चालवतात. त्यानंतर सायंकाळी चायनीजचे दुकान लावतात. यावर त्यांचा कुटूंबाचा उदनिर्वाह भागतो. यातून मिळालेला वेळ ते त्यांची आवड आणि छंद जोपासण्यासाठी देत असतात.

अनेक आकर्षक वस्‍तूंचे दालन

दुकानावरुन वस्तू आणल्यानंतर पुठ्ठे फेकून देतो, तसेच इतरही भांडे अथवा काही वस्तू खराब झाल्या की भंगारमध्ये देतो. मात्र याच टाकाऊ वस्तूंपासून लखन सोनवणे यांनी आकर्षक अशा टिकाऊ वस्तू बनविल्या आहेत. यात रेल्वेची प्रतिकृती, ढाल, तलवार, रिक्षा, ट्रॅक्टर, गीटार, पाळणा यासारख्‍या वस्तू बनविल्या आहेत. अनेक मुले, नागरिक शाळेचा (School) प्रोजेक्ट असेल किंवा विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी थेट लखन सोनवणेच्या घरी येतात. सोनवणेही कुठलेही पैसे न घेता आवडीपोटी लहान मुलांना ते सांगतील त्याप्रमाणे वस्तू बनवून देतात. लहान मुलांनाही कला अवगत व्हावी म्हणून ते त्यांना शिकवतात सुध्दा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com