इंजिनिअर तरुणाने केली स्वखर्चाने बोअरवेल; पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार

इंजिनिअर तरुणाने केली स्वखर्चाने बोअरवेल; पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : कामपूर (ता. शिंदखेडा) या दीड हजार लोकवस्तीच्या गावात अल्प प्रमाणात पर्जन्यमान असल्याने पाणीटंचाई ही नित्याचीच... कधी टँकर लावून तर कधी विहीर अधिग्रहित करून करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावकरी प्रयत्न करायचे पण यावर कायमची मात करण्याचा निर्धार करत कामपूरचा (Dhule News) सुपुत्र इंजिनिअर विष्णू बाजीराव पाटील यांनी गावापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतात स्वखर्चाने बोअरवेल करून गावात पाणी आणले. (dhule news Borewells built by a young engineer at his own expense)

Dhule News
४०० पोलिसांच्या बदल्या; पारदर्शक प्रक्रियेसाठी एसपी सातपुतेंचा पुढाकार

आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुसुम निकम यांनीदेखील शब्द देत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाइपलाइनसाठी निधी देण्याचा शब्द दिला त्यामुळे विष्णू पाटील याला पाठबळ मिळाले. बोअरवेल झाल्यानंतर तीन इंची पाणी लागले म्हणून त्यांनी तात्काळ शासकीय कार्यवाही करून टंचाई निधीतून पाइपलाइनसाठी निधी मिळावा म्हणून आमदार श्री. रावल यांच्यामार्फत श्रीमती निकम यांच्याकडे प्रस्ताव सादर केला, त्याला तात्काळ मंजुरी मिळवून पाइपलाइन चे काम सुरू झाले.

ग्रामस्‍थांमध्‍ये आनंदोत्‍सव

आठ दिवस रात्रंदिवस काम सुरू होते. स्वतः विष्णू पाटीलने उभे हे राहून हे काम करून घेतले. १८ मेस पाइपलाइनमधून गावात पाणी आले. गावात पाणी आल्यावर गावविहिरी जवळ ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. या कामासाठी वकील पाटील, जितेंद्रसिंग गिरासे, दुर्गेश पाटील, भरतसिंग गिरासे व संपूर्ण कामपूर ग्रामस्थांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com