Yawal News Saam tv
महाराष्ट्र

Yawal News : यावलमध्ये लाखोंचा गांजा जप्त; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon News : यावल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांनी वाघझिरा येथून गांजा आणल्याची कबुली दिली असून, पोलिसांना या प्रकरणी तिघांना अटक केली व त्यांच्याकडून १ लाख ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Rajesh Sonwane

जळगाव : गांजा तस्करी विरोधात अनेकदा कारवाई करण्यात येत असताना देखील छुप्या पद्धतीने सर्रासपणे गांजाची तस्करी करण्यात येत असते. अशाच प्रकारे यावल- चोपडा रस्त्यावर गांजा नेत असताना यावल पोलिसांनी कारवाई करत ४ किलो गांजा जप्त केला आहे. ज्याची किंमत १ लाख ९०० रुपये इतकी आहे. या कारवाईत दोघांना ताब्यात घेतलेे असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगावच्या यावल तालुक्यातील वाघझिरा येथून गांजाची खरेदी करून दोन जण भुसावळकडे जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, यावलचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक तयार करून यावल- चोपडा रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार वाघझिराकडून दुचाकीने आलेल्या दोघांची पोलिसांनी चौकशी करत तपासणी केली. 

गांजासह मुद्देमाल जप्त 

वाघझिराकडून दुचाकीवर आलेले युसूफ शहा मुलजार शहा (रा. मुस्लिम कॉलनी, ताज हॉटेल, खडका रोड, भुसावळ) आणि युनूस सुलतान शेख (रा. गरीब नवाज खडका रोड, भुसावळ) या दोघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ किलो ६० ग्रॅम गांजा जप्त केला. तसेच गांजासह इतर साहित्य, असा एकूण १ लाख ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

तिघांविरोधात गुन्हा दाखल 

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गांजा कुठून आणला, यासंर्दभात विचारण केली. यात गांजा वाघझिरा येथून भामसिंग पुट्या बारेला यांच्याकडून खरेदी केला असल्याची माहिती दिली. त्यानुसार याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार विजय पाचपोळे, पोलिस कर्मचारी रोहिल गणेश, वसीम तडवी तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - - तुमसर नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रितेमुळे दुर्गा देवीचा पेंडालात घाण पाण्याच्या विळखा

Swami Chaitanyananda Saraswati : आय लव्ह यू, बेबी.... आश्रमातल्या बाबाचे एकापेक्षा एक कारनामे, Whatsapp चॅट उघड

Subodh Bhave: सुबोध भावे झळकणार नव्या बायोपिकमध्ये; निम करोली बाबांची साकारणार भूमिका, पोस्टर प्रदर्शित

Satara : वरवी पिठाची भाकरी खाल्ल्याने ७० जणांना विषबाधा; पीठ विक्रेत्यांचे दुकाने सील

२ गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला; NCP आमदाराच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT