Ganesh Festival : तुळजापुरात पुरातन विहिरीत गणेशाची स्थापना; ५० फूट दगडी विहिरीच्या कमानीत बाप्पा विराजमान

Dharashiv News : काही गावांमध्ये चालत आलेल्या परंपरेनुसार गणरायाची स्थापना करण्यात येत असते. त्यानुसार तुळजापूरमध्ये देखील एका पुरातन अशा विहिरीत मागील पंधरा वर्षांपासून गणपतीची स्थापना करण्यात येत आहे
Ganesh Festival
Ganesh FestivalSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: राज्यभरात गणरायाचा मोठ्या जल्लोषात स्वागत करत ठिकठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. तर धाराशिवच्या तुळजापुरात आगळावेगळ्या पद्धतीने गणरायांचे स्वागत केलं जातं. तुळजापुरातील साळुंखे गल्लीत असलेल्या ऐतिहासिक पुरातन विहिरीत गणरायांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. जय भारत गणेश मंडळाकडून गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.

लाडक्या गणरायाच्या आगमनाची आतुरता संपली असून जल्लोषात स्वागत मिरवणूक काढत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. सार्वजनिक मंडळ व घरगुती गणपतीचे विधिवत पद्धतीने स्थापना करण्यात येत आहे. तर काही गावांमध्ये चालत आलेल्या परंपरेनुसार गणरायाची स्थापना करण्यात येत असते. त्यानुसार तुळजापूरमध्ये देखील एका पुरातन अशा विहिरीत मागील पंधरा वर्षांपासून गणपतीची स्थापना करण्यात येत आहे. 

Ganesh Festival
Amravati : हरतालिकेच्या पूजेच्या दिवशीच चिमुकलीचा मृत्यू; पूजेसाठी नदीवर गेली असता बुडाली

विहिरीच्या संवर्धनासाठी गणपती स्थापना 

पुरातन दगडी विहिरीच्या 40 ते 50 फुटी दगडी विहिरीच्या दगडी कमानीत गणराय विराजमान केले जातात. ऐतिहासिक विहिरीच्या संवर्धनासाठी आम्ही विहिरीत गणपती बसवण्याचा निर्णय घेतला असल्याचे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. या आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केलेली गणरायाला पाहण्यासाठी जिल्हाभरातून गणेश भक्त गर्दी करतात. 

Ganesh Festival
Pandharpur : शेतकरी कर्जमाफी करण्याची गणरायाने सरकारला सुबुद्धी द्यावी; जनशक्ती शेतकरी संघटनेचे विविध ठिकाणी फलक

सांगलीतील शाही गणपतीची प्रतिष्ठापना
सांगली : तब्बल १८३ वर्षाची परंपरा असणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणपतीची आज प्रतिष्ठापना करण्यात आली. सांगली गणपती संस्थानाचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन आणि युवराज कुमार आदित्य राजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत शाही गणपतीची आरती करण्यात आली. प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची शाही लवाजाम्यांसह पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. पुढील पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जात असून पाचव्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com