Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : बैलगाडीत बसून जाताना झाला घात; चाकात शाल अडकून बसला गळफास

Jalgaon News : मध्य प्रदेशातील गोंट्या पांचाळ येथील मूळ रहिवाशी असलेली जानुबाई भायला बारेला (वय ३२) ही कामासाठी भादली (ता. जळगाव) येथे वास्तव्यास होती. मोल मजुरी करून त्या व त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह सुरु होता.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सकाळी शेतमजुर बैलगाडीतून कामासाठी शेतात जात होते. या दरम्यान बेगडीत बसलेल्या शेतमजूर महिलेच्या (Jalgaon) अंगावरील शाल चाकात अडकल्याने ती ओढली जाऊन गळ्याभोवती फास बसला. यात जखमी होऊन महिलेचा (Death) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बदली येथे २४ फेब्रुवारीला घडली. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) गोंट्या पांचाळ येथील मूळ रहिवाशी असलेली जानुबाई भायला बारेला (वय ३२) ही कामासाठी भादली (ता. जळगाव) येथे वास्तव्यास होती. मोल मजुरी करून त्या व त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह सुरु होता. दरम्यान २४ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजेच्या सुमारास भादलीच्या शेतशिवारात बैलगाडीने (Bullock Cart) परिवारासह कामाला जात होते. त्यांच्या अंगावरील शालीचा काही भाग बैलगाडीच्या चाकात आला. बैलगाडीच्या वेगाने त्यांच्या मानेला जोरात गळफास बसल्याने महिला जबर जखमी झाली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवून त्यांना पाणी पाजले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नशिराबाद पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर घटनेची माहिती घेत पंचनामा केला. महिलेच्या अचानक मृत्यूने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला दीर शांतीराम बारेला यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kazakhstan Tourism: लोणावळा-खंडाळा सोडा, 'या' ठिकाणी करा हॉलिडे प्लॅन; तुमचे १० हजार होतील ५८ हजार; वाचा संपूर्ण माहिती

Peanuts Benefits: हिवाळ्यात रोज शेंगदाणे खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

New Labour Rules : पीएफ वाढणार, पण हातात येणार पगार कमी होणार, नव्या कामगार कायद्यामुळे CTC चं गणित बदलणार

Yellow Batata Bhaji: उकडलेल्या बटाट्याची पिवळी झणझणीत भाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update : मुंबईच्या माहीम पूर्व झोपडपट्टी परिसरात मोठी आग

SCROLL FOR NEXT