Fraud Marriage Saam tv
महाराष्ट्र

Fraud Marriage : मंदिरावर थाटात लग्न; दुसऱ्या दिवशी नववधू दागिने घेऊन झाली पसार

Jalgaon News : १६ मार्चला तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाइकांच्या उपस्थितीत मयूर चौधरी याचे नंदिनी गायकवाड हिच्यासोबत विवाह सोहळा पार पडला.

Rajesh Sonwane

जळगाव : बनावट लग्न लावून देणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळीकडून लग्नासाठी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रमापासून तर सांगणं सोहळा पार पाडेपर्यंत सर्व विधी पार पाडल्या जातात. परंतु लग्न (Marriage) झाल्यानंतर दुसरीच दिवशी नवरी मुलगी फरफ होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार (Jalgaon) जळगावात समोर आला असून लग्न लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे नवरी मुलगी दागिने व रोकड घेऊन घेऊन गायब झाली आहे.  याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

जळगाव महापालिकेत नोकरीस असलेले शरद काशीनाथ चौधरी यांचा मुलगा मयूरच्या लग्नासाठी मुलीचा शोध सुरु होता. दरम्यान १३ फेब्रुवारीला चौधरी यांना पूजा विजय माने या महिलेचा फोन करून मुलगी असल्याचे सांगितले. मेहकर (ता. बुलढाणा) येथे येऊन मुलगी बघून घेण्यास सांगितले. त्यानुसार मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. मयूरला मुलगी पसंत पडल्याने पूजा माने यांनी त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली. मात्र, चौधरी यांनी आम्ही एक लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगत ते लग्नाच्या तयारीला लागले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान १६ मार्चला तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाइकांच्या उपस्थितीत मयूर चौधरी याचे नंदिनी गायकवाड हिच्यासोबत विवाह सोहळा पार पडला. या वेळी मुलीकडून पूजा माने, नंदिनीची मैत्रीण नीता अर्जुन गणवार, मावशी, मुलीचा मावसभाऊ हजर होते. लग्न आटोपल्यानंतर चौधरी यांनी पूजा माने हिला एक लाख रुपये दिले. लग्नकार्य आटोपल्यानंतर सायंकाळी सर्वजण घरी परतले. दरम्यान घरातील सर्वजण झोपले असताना पहाटे नववधू नंदिनी व तिची मैत्रीण गायब झाल्या होत्या. घरात दिसून न आल्याने चौधरी कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. पहाटे काळ्या रंगाच्या चारचाकीत बसून नववधू व तिच्या मैत्रीणीला जाताना पाहिल्याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT