Water Shortage : पाण्यासाठी गावकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ; पुरंदर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई

Pune News : राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी खाजगी टँकर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
Water Shortage
Water ShortageSaam tv
Published On

पुणे : राज्यात यंदाचा दुष्काळ तीव्र होत चालला आहे. पाणी टंचाईच्या झळा सर्वत्र सहन कराव्यात लागत असून (Pune) पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पाण्याची टंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. पाण्याची टंचाई भीषण असल्याने गावकऱ्यांना गाव सोडण्याची वेळ आता आली आहे. (Tajya Batmya)

Water Shortage
Child Marriage : अक्षता पडण्याआधी रोखले पाच बालविवाह; यवतमाळच्या प्रशासनाची एकाच दिवशी कारवाई

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरू असल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक (Water Scarcity) ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी खाजगी टँकर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानुसार पुणे विभागात जवळपास ३५० हून अधिक गावात ३९१ खाजगी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पुरंदर (Purandar) तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना प्यायला पाणी नसल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक भागात तर पैसे देऊन पिण्याच पाणी खरेदी करावं लागत आहे. (Water Crisis) महत्त्वाची बाब म्हणजे जनावरांना देखील खराब पाणी हे पैसे देऊन खरेदी करावं लागत असल्याने तालुक्यातील अनेक लोक हे आत्ता गाव सोडण्याच्या तयारीत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Water Shortage
RTE Admission : आरटीई प्रवेशाच्या परिपत्रकात बदल; स्वराज्य संघटनेने शिक्षण आयुक्तांना घंटा वाजवून दिले निवेदन

स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की गेले तीन- चार वर्षात पाऊसच पडला नाही. नुसता दुष्काळ आहे. नाझरे धरणात पाणी नाही. आणि पाणी नसेल तर गाव सोडावं लागत आहे. धरणामध्ये आता फक्त गाळ शिल्लक राहिल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्हाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे येथील नागरिकांनी म्हटल आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू असून निवडणुकीत उभे असलेले उमेदवार हे आमच्याकडे येतात आणि पाणी आणु अस सांगतात. पण निवडणूक झाली की पुढच्या पाच वर्षानंतर पुन्हा ते आमच्याकडे फक्त मतदानासाठीच येत असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com