संजय राठोड
यवतमाळ : सध्या लग्नाचा धुमधडाका सुरु आहे. पुढे लग्नाच्या तारखा नसल्याने लग्न सोहळे उरकले जात आहेत. (Yavatmal) यवतमाळ येथे अशाच एका सामूहिक विवाह सोहळ्यात होत असलेले पाच बालविवाह (Child Marriage) रोखण्यात आले आहेत. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने कारवाई केली आहे. (Latest marathi News)
पुढील एक महिनाभर लग्नाच्या तारखा नसल्याने लग्नाचा धुमधडाका सुरु आहे. मात्र काहीजण मुलाचे किंवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाले नसताना देखील (Marriage) लग्न लावून देण्याच्या तयारीत असतात. अशांवर बाल संरक्षण विभागाचे लक्ष असते. अशाच प्रकारे यवतमाळ जिल्हा बाल संरक्षण कक्षाने कारवाई करत एकाच दिवशी पाच मुलीचे बालविवाह रोखण्यात यश आले. हे विवाह यवतमाळमध्ये आयोजित एका सामूहिक विवाह सोहळ्यात केले जात असल्याचे समोर आले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बाल विवाह होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. त्यावरून यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा येथे आठ बालविवाह नियोजित होते असे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारावरून नववधूंच्या वयाची शहानिशा केल्यानंतर त्यात पाच बालिका ह्या अल्पवयीन असल्याचे समजल्याने विवाह रोखण्यात आले. दरम्यान पुढिल कारवाई जिल्हा बाल कल्याण विभागा करित आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.