जळगाव : सुवर्णपेढीत अंगठी घेण्याच्या निमित्ताने येऊन एका महिलेने हातचलाखी करत दुकानातील (Jalgaon) तब्बल १२ सोन्याच्या अंगठ्या लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शनिपेठ (Police) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)
जळगावच्या सुवर्ण बाजारात सध्या लग्नसराईमुळे दागिने खरेदी करणाऱ्यांची गर्दी आहे. या गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करत आहेत. मात्र सुवर्णपेढीतूनच अंगठ्या लांबविल्याची घटना समोर आली आहे. (Crime News) सराफ बाजारातील योगेश पंढरीनाथ सुवर्णकार यांचे सुभाष चौकातील भवानीमाता मंदिराजवळ शुभ लाभ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दरम्यान २१ एप्रिलला सकाळी अकराला योगेश सुवर्णकार दुकानात असताना एक महिला (Gold) सोन्याची अंगठी घेण्यासाठी दुकानात आली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सोन्याची अंगठी खरेदीचा बनाव करत एका मागून एक अनेक डिझाईन महिलेने बघितले. नंतर महिलेने हात चालाखी करत तब्बल १ लाख ७७ हजार ४०० रुपयांच्या १२ सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर योगेश सुवर्णकार यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी महिलेविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनगे तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.