Hanuman Jayanti 2024 : हनुमानाची मुर्ती चक्‍क लोण्याची..., उन्हाळ्यात तापमान ४५ अंशावर गेल्यानंतरही वितळत नाही

Avchit Hanuman : तापी नदीच्या काठावर वसलेले हे हनुमानाचे मंदिर ओळखले जाते. या मंदिरावर हनुमान जयंतीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दीही पाहायला मिळते. नवसाला पावणारा अवचित हनुमान अशी त्याची ओळख आहे.
Hanuman Jayanti 2024
Hanuman Jayanti 2024Saam Tv

Jalgaon News :

चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव राज्यभरात साजरा केला जातो. यंदा हनुमान जयंती ही २३ एप्रिल २०२४ रोजी म्हणजे आज साजरा केली जात आहे. यादिवशी बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण व्रत-वैकल्य करतात.

महाराष्ट्रात असे अनेक राज्य आहेत तिथे हनुमानाचे मंदिर अधिक प्रचिलीत आहे. अशातच जळगावमधील (Jalgaon) रिधूर या तालुक्यात हनुमानाचे दोन पुरातन मंदिर आहे. यापूर्वी मंदिरात आपण पीओपी किंवा दगडाची मूर्ती पाहिली असेलच. पण जळगावमधील भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून हनुमानाची (Hanuman) मुर्ती साकारण्यात आली आहे.

विशेष म्हणजे जळगावमधील तापमान ४५ डिग्रीच्या वर गेल्यानंतरही मूर्तीवरील लोणी वितळत नाही. तापी नदीच्या काठावर वसलेले हे हनुमानाचे मंदिर ओळखले जाते. या मंदिरावर हनुमान जयंतीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दीही पाहायला मिळते. नवसाला पावणारा अवचित हनुमान अशी त्याची ओळख आहे.

Hanuman Jayanti 2024
Hanuman Jayanti 2024 : अंजनीपुत्र हनुमान की जय..., शेकडाे भाविकांच्या घोषणांनी दुमदुमली अंजनेरी

ही मूर्ती साधरणत: आठ फुटाची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. उन्हाळ्यात देखील या मूर्तीवरील लोणी वितळत नाही.

1. हनुमानाला लोणी चढवण्याची प्रथा

जळगावमधील एका व्यक्तीने हनुमानाला साकड घातलं होतं. त्यांनी त्यांच्या दूध न देणाऱ्या म्हशीला पुन्हा दूध देऊ लागल्यावर तुला लोण्याचा नवस दाखवेल अशी इच्छा व्यक्त केली. हनुमानाचा चमत्‍कार म्‍हणावा की काय म्‍हणून त्यांच्या म्हशीने दुसऱ्याच दिवशी दूध दिले.

Hanuman Jayanti 2024
Hanuman Jayanti 2024: मारूतीयाला हनुमान का म्हणतात? जाणून घ्या

ही व्यक्ती त्यानंतर लोण्याचा गोळा घेऊन हनुमानाच्या मंदिरावर येण्यासाठी निघाली. येताना रात्र झाल्याने सकाळी नवस फेडण्याच्या विचाराने लोण्याचे भांडे छताला टांगून नातेवाईकांकडे मुक्काम केला. त्या रात्री अचानक घराला आग लागली. आगीत सगळे काही जळून खाक झाले. पण लोण्यचे छताला टांगलेले मडके तसेच राहिले. त्यातील लोणी अवचित हनुमानाला नवस फेडण्यासाठी अर्पण करण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला अवचित हनुमानाच्या मूर्तीस लोणी चढविण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे.

लोण्यापासून साकारलेल्‍या मारुतीच्या मुर्तीवर दरवर्षी लोणी लावले जाते. मुर्ती लोण्याची असली तर त्‍यावर कोणत्‍याही प्रकारचा परिणाम जाणवून येत नाही. या तिव्र उन्हाच्या झळांमध्ये देखील मुर्तीवरील लोणी वितळत नाही. याबाबतची माहिती मंदिरातील दिपक महाराज,पुजारी आणि भाविक पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com