Manasvi Choudhary
अंजनी पुत्र बजरंगबलीचे आधी नाव मारूती होते.
मारूतीची अनेक नावे आहेत. बजरंगबली म्हणजेच हनुमान नावाने जास्त प्रचलित आहे.मारूतीचं नाव हनुमान पडण्यामागे एक कथा आहे.
मारूतीराय लहानपणापासून प्रचंड शक्तीशाली आणि प्रभावशाली होते.
पौराणिक कथेनुसार, मारूतीराय लहान असताना झोपेतून उठल्यानंतर त्यांना भूक लागली.
तेव्हा त्यांनी झाडाच्या दिशेने नजर फिरवली तर त्यांना लाल रंगासारखे एक फळ दिसले.ते लाल फळ नसून उगवता सूर्य होता
मारूतीराय फळ समजून सूर्याकडे झेपावले आणि सूर्याला खाण्यासाठी तोंड मोठे केले. सूर्याची सर्व किरणे पोटात घेऊन सूर्याला गिळून टाकलं.
मारूतीने सूर्याला गिळल्यामुळे पृथ्वीवर सर्वत्र अंधार झाला. सृष्टीचं चक्र बिघडलं. सूर्याकडे जाऊ नये यासाठी त्यांना अनेक देवी देवतांनी अडवले पण ते ऐकले नाही.
शेवटी इंद्रदेव क्रोधीत झाले. त्यांनी वज्राने मारूतीवर हल्ला केला. इंद्रदेवाने मारूतीरायाच्या हनुवटीवर वज्राने प्रहार केला.
मारूतीच्या हनुवटीला दुखापत झाली.त्यामुळेच त्यांना हनुमान असंही म्हंटलं जातं.
सदर माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे अधिक तपशीलासाठी योग्य मार्गदर्शन घ्या.