महाराष्ट्र

हरला नाही..जन्‍मतः अंध तरी त्‍याने लिहिला काव्‍यसंग्रह

हरला नाही..जन्‍मतः अंध तरी त्‍याने लिहिला काव्‍यसंग्रह

साम टिव्ही ब्युरो

वाघोदा (जळगाव) : मोठा वाघोदा येथील प्रज्ञाचक्षू महेंद्र सुकदेव वानखेडे या युवकाने अनेक अडचणींवर मात करत साहित्य सेवेचे व्रत अंगिकारले. जन्‍मतः अंधत्‍व असताना देखील त्‍याने जिद्द सोडली नाही. शिक्षण पुर्ण करत काम केले. इतक्‍यावरच थांबला नाही, तर काव्‍यसंग्रह लिहून त्‍याचे प्रकाशनही केले. (jalgaon-news-waghod-village-mahendra-wankhede-Although-he-was-born-blind-he-wrote-poems)

महेंद्र वानखेडे युवकाने ‘काव्य दृष्टी’ या काव्यसंग्रहाचे नुकताच प्रकाशन झाले. रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील रहिवाशी महेंद्र वानखेडे हा जन्मतः अंध आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण वाघोदा येथे झाले. घरची परिस्थिती हालाखीची असताना व त्यातल्या त्यात महेंद्र स्वतः दृष्टीहीन असताना सुद्धा अभ्यासाची फार आवड होती. पुढील शिक्षण करता यावे म्हणून त्याने जळगाव गाठले. प्रवास जरी खडतर असला तरीही त्यांने जिद्द सोडली नाही. परिस्थितीचा बाऊ न करता काव्यदृष्टी हा या काव्यसंग्रहाचा जन्म झाला. आपला काव्यसंग्रह प्रकाशित करून महेंद्र समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

वेगवेगळे प्रशिक्षण केले पुर्ण

बीए ची पदवी घेतल्यानंतर त्यांने खुर्ची विणकाम, फाईल तयार करणे, लेथ मशीन ऑपरेटिंग, मोटर वाइंडिंगचे प्रशिक्षण घेतले. हे सर्व करत असताना मनातल्या भावनांना कुठेतरी वाट मोकळी करता यावी; म्हणून महेंद्रला कविता करण्याचा छंद जडला. कुटुंबात उच्चशिक्षित कोणी नसताना व कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना, फक्त स्वतःच्या मेहनतीने व जिद्दीने महेंद्रने हे करून दाखवले.

बहिण भावाच्‍या मदतीने उतरविले कागदावर

काव्यदृष्टी या काव्यसंग्रहातून महेंद्रने जीवनाचे तत्त्वज्ञान सहज व साध्या शैलीत मांडले आहे. जीवन जगत असताना डोळ्यांची नाही; तर आत्मिक दृष्टीची गरज असते हे त्यांने सिद्ध करून दाखवले आहे. सहज वाटत असणारे हे कार्य फार अवघड असे होते. दृष्टिहीन असलेल्या महेंद्रला ब्रेन लिपी अवगत असल्यामुळे त्याने अगोदर हा काव्यसंग्रह ब्रेन लिपीच्या सहाय्याने साकारला. नंतर महेंद्रच्या बहीण व भाऊ यांनी त्याच्या संकल्पना कागदावर उतरवल्या. त्याचा हा कवितासंग्रह प्रसिद्ध करण्यासाठी दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन व दीपस्तंभच्या मनोबल प्रकल्पाचे जगदीश महाजन व अमोल महाजन यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT