कैलास शिंदे
जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas aaghadi) पावसाळी अधिवेशन गुंडाळण्याची घाई झाली आहे. यात ओबीसी आरक्षणाला पध्दतशीरपणे खो देण्यासाठी आणि भाजपचे (BJP) सभागृहातील संख्याबळ कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आमदार निलंबनाचा कुटील डाव रचल्याची टीका माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन (Girish mahajan) यांनी केली आहे. (jalgaon-news-girish-mahajan-statement-bjp-mla-dismiss-matter-in-mahavikas-aaghadi)
राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबीत करण्यात आले. यात माजी मंत्री तथा जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांचा देखील समावेश आहे. निलंबनावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. महाजन म्हणाले, की राज्यातील ओबीसी समुदायाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असले तरी महाविकास आघाडी सरकार ढिम्म बसून आहे. त्यांना ओबीसींना हक्क द्यायचे नाहीत. यामुळे आज कथितरित्या ओबीसी हिताचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान सरकारने रचले आहे. यामुळे सभागृहात चर्चेची तयारी दाखविणार्या भाजपच्या बारा आमदारांना निलंबीत करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीच्या आमदारांचेच असभ्य वर्तन
वास्तविक पाहता भाजपच्या आमदारांनी नव्हे तर महाविकास आघाडीच्या आमदाराने असभ्य वर्तन केल्याचे सर्वांनी पाहिले असून याचे सीसीटिव्ही फुटेज सरकारने तपासण्याची गरज आहे. मात्र आपल्या आमदारावर कारवाई करायचे सोडून भाजपच्या आमदारांचे निलंबन करण्याचा नालायकपणा या सरकारने केला आहे. याचाच अर्थ या सरकारला ओबीसींच्या हिताशी काही देणेघेणे नाही. भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे सरकार बदनाम झाले असून सभागृहात आपली कोंडी होऊ नये म्हणून भाजपचे १२ आमदार निलंबीत करून विरोधी पक्षाचे संख्याबळ कमी करण्याचे कारस्थान रचल्याचे यातून दिसून आले आहे.
निलंबन केले तरी लढा कायम
आमदार महाजन म्हणाले, की सरकारने आमचे निलंबन केले असले तरी आमचा लढा कायम सुरू राहणार आहे. आम्ही कुणाच्या दबावाला भिक घालणार नाही. सभागृह नसले तरी आमच्यासाठी प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि थेट जनतेच्या दरबाराचे पर्याय आहेच. आम्ही जनेतेत जाऊन महाभकास आघाडी सरकारचे लक्तरे वेशीवर टांगू, आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही गिरीश महाजन यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.