Raver Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : रेल्वेतून पडून तरुणांसह तिघांचा मृत्यू; रावेरजवळील घटना 

Jalgaon News : खंडवा येथून भुसावळ येथे विवाह कार्यक्रमात वाद्य वाजविण्यासाठी जाणाऱ्या दोन तरुणांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू ओढवला

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : रेल्वेने प्रवास करत असताना धावत्या रेल्वेतून पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना (Jalgaon) वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून सदरची घटना २ डिसेंबरला रावेर (Raver) तालुका परिसरात घडली असून याबाबत रावेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

रावेर येथील जी. आय. कॉलनीतील रहिवासी व महसूल विभागातील निवृत्त शिपाई रतन राजाराम भालेराव (वय ६३) हे सकाळी साडेअकराच्या सुमारास रेल्वेने भुसावळकडे जात हेतो. या दरम्यान रेल्वेतून तोल जाऊन ते रेल्वेखाली आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मनोज भालेराव यांनी रावेर पोलिस ठाण्यात माहिती दिली. हवालदार अर्जुन सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू
दुसऱ्या घटनेत खंडवा येथून भुसावळ येथे विवाह कार्यक्रमात वाद्य वाजविण्यासाठी जाणाऱ्या दोन तरुणांचा धावत्या (Railway) रेल्वेतून पडून मृत्यू ओढवला. रावेर ते अजंदा गावादरम्यान खंबा क्रमांक १७५ जवळ दोन तरुण धावत्या रेल्वेतून तोल जाऊन पडले. त्यापैकी आकाश किशोर वेद (वय ३५) याचा जागेवरच मृत्यू झाला तर मोनू बल्ला मुडेला (वय ३०) हा रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याने त्यास भुसावळ येथे उपचारार्थ नेण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला. याबाबत तरुण सुरेश नागिले (रा. खंडवा) यांनी दिलेल्या माहितीवरून रावेर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Facepack: नॅचरल ग्लोसाठी आठवड्यातून २ वेळा हा खास होममेड फेसपॅक नक्की लावा

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोठी दुर्घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट

Hotel room hidden camera: तुमच्या हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरा तर लपवलेला नाही ना? छुपा कॅमेरा शोधण्यासाठी वापरा ही ट्रिक

उमेदवाराची रास कोणती? कशी असेल निवडणूक, भाग्य उजळणार की आणखी काही...वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये प्रचाराच्या सांगते वेळी दुर्दैवी घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट

SCROLL FOR NEXT