Travel Fire: दैव चांगले म्हणून वाचले २० प्रवाशांचे प्राण; रावेरजवळ धावती खासगी बस पेटली, प्रवाशांचा सामान खाक

Jalgaon Raver News : रावेर- सावदा रस्त्यावरील वडगावजवळील सुकी नदीच्या पुलाजवळ ही घटना शनिवारी सायंकाळी घडली
Jalgaon Travel Fire
Jalgaon Travel FireSaam tv
Published On

रावेर (जळगाव) : दिवाळीनिमित्ताने गावाकडे आलेले तर माहेरी आलेल्या सासुरवाशिणी देखील परतीच्या प्रवासाला लागले आहेत. असाच प्रवास करणाऱ्या प्रश्नच जीव टांगणीला लागला होता. पुण्याकडे (Jalgaon) जाणाऱ्या खासगी बसने अचानक अचानक पेट घेतला. यानंतर प्रवाशी आरोड्या मारत जीव मुठीत घेऊन धावपळ करू लागले. या घटनेच्या थरारत 20 प्रवाशांचे प्राण वाचले असून त्यांच्या सर्व सामानाचा मात्र कोळसा झाला आहे. (Raver) रावेर- सावदा रस्त्यावरील वडगावजवळील सुकी नदीच्या पुलाजवळ ही घटना शनिवारी (ता. १८) सायंकाळी घडली. (Maharashtra News)

Jalgaon Travel Fire
Sanjay Raut News: 'पुर्वी क्रिकेट खेळ होता, आता भाजपचा इव्हेंट...' संजय राऊतांची फटकेबाजी!

रावेरकडून पुण्याकडे निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्सची रावेर- पुणे बस प्रवाशांना घेऊन १८ नोव्हेंबरला जात असताना रावेर - सावदा रस्त्यावरील वडगावजवळील सुकी नदीच्या पुलापुढील वळणावर बसने अचानक पेट घेतला. प्रवाशांच्या हे लक्षात येताच त्यांची तारांबळ उडाली. सुदैवाने गाडीतून धूर निघत (Fire) असल्याचे कळल्याने आणि सायंकाळी त्यावेळी काहीसा उजेड असल्याने सर्व प्रवासी भराभर बसमधून खाली उतरले. रावेर, सावदा आदी ठिकाणच्या अग्निशमनने आग विझविली. मात्र या आगीत प्रवाशांचा सर्व सामान जळून खाक झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Travel Fire
Sugar Factory Highest Rate: पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्यात सर्वाधिक दर; कारखान्यांमध्ये लागली स्पर्धा

vसुदैवाने वाचले प्राण 

बसमध्ये सुमारे २० प्रवासी होते. टायर फुटल्याने आग लागल्याचे काहींचे म्हणणे आहे. या दुर्घटनेत प्रवाशांचा जीव वाचला असला तरी बहुतेकांचे सामान गाडीतच राहून गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. जर ही घटना रात्री प्रवासी भर झोपेत असताना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com