Sugar Factory Highest Rate: पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्यात सर्वाधिक दर; कारखान्यांमध्ये लागली स्पर्धा

Pandharpur News : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ऊसाची पळापळावी सुरु झाली आहे
Pandharpur Sugar Factory
Pandharpur Sugar FactorySaam tv

पंढरपूर : राज्यात सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांमध्ये (Sugar Factory) ऊस दराची स्पर्धा सुरु झाली आहे. दरवर्षी सर्वाधिक भाव देणाऱ्या माढ्याच्या विठ्ठलराव शिंदे आणि श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखान्याला मागे टाकत (Pandharpur) पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ८२५ इतकी पहिली उचल जाहीर केली आहे. तर मार्चमध्ये येणाऱ्या ऊसाला तब्बल ३ हजार रुपयांचा भाव देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Pandharpur Sugar Factory
Maya Tigress: ताडोबातील सेलिब्रिटी माया वाघिणीचा मृत्यू ? शोध मोहिमेत सापडले कुजलेले अवयव

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ४० साखर कारखाने आहेत. या वर्षी आतापर्यंत ३५ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे. आज अखेर जिल्ह्यात १७ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. जिल्ह्यात यावर्षी २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यावर्षी जिल्ह्यात किमान १३० लाख मेट टन ऊसाचे  उत्पादन होईल असा अंदाज आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ऊसाची पळापळावी सुरु झाली आहे. त्यातूनच (Sugarcane) ऊस दराची स्पर्धा सुरु झाली आहे. साधरण मार्चपर्यंत हंगाम सुरु राहिला असाही अंदाज आहे. त्यामुळे अधिकाधिक ऊस गाळप करण्यासाठी कारखान्यांची धडपड सुरु आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur Sugar Factory
Solapur Crime News: MIDC परिसरातून ड्रग्सची तस्करी, तो पैसे पुरवायचा, पोलिसांनी अशी केली अटक?

दोन दिवसांपूर्वी (farmer) श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने २ हजार ८०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली होती. त्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने २ हजार ८२५ रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. यापूर्वी जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांनी २४०० ते २७०० रुपये इतका पहिला हप्ता जाहीर केला होता. या दरम्यान विठ्ठल साखर कारखान्याने २ हजार ८२५ रुपयांचा दर जाहीर करुन ऊस दराची स्पर्धा आणखी तीव्र केली आहे. मागील हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरासरी २५०० ते २७०० रुपयांचा अंतिम दर दिला आहे. यंदा ऊस कमी असल्याने बहुतांश साखर कारखान्यांनी पहिला हप्ता  २७०० ते २८०० रुपये जाहीर केला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात मागील काही हंगामात गाळप झालेला  ऊस (लाख मेट)
६३ लाख (२०१९-२०)
१३६  लाख (२०२०-२१)
२३० लाख (२०२१-२२)
१८२ लाख (२०२२-२३) 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com