Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : ऊसतोड कामगारांना गावी येण्यास मज्जाव; दमदाटी करत गावात डांबले, पुणे जिल्ह्यातून कुटुंबीयांची सुटका

Jalgaon News : कामगारांना ऊसतोडणीचे काम करण्याच्या निमित्ताने ठेकेदाराने पुणे जिल्ह्यातील वाळकी या गावात नेण्यात आले. या ठिकाणी ठेकेदाराकडून ऊस तोडणीचे काम न सांगता वेगळ्या कामाला लावण्यात आलं

संजय महाजन

जळगाव : ऊस तोडणीच्या कामानिमित्ताने अनेक कामगार बाहेर स्थलांतर करत असतात. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील पारोळा, भडगावसह इतर तालुक्यातील सहा ते सात ऊसतोड कामगारांचे कुटुंब पुणे जिल्ह्यात गेले होते. यानंतर या कुटुंबांना पुणे जिल्ह्यातील वाळकी येथे डांबून ठेवण्यात आले होते. या कामगारांना जनसहस फाउंडेशनच्या प्रयत्नातून सुटका करण्यात आली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील पारोळा, भडगाव तसेच वेगवेगळ्या तालुक्यातील कामगारांना ऊसतोडणीचे काम करण्याच्या निमित्ताने ठेकेदाराने पुणे जिल्ह्यातील वाळकी या गावात नेण्यात आले होते. या ठिकाणी नेल्यानंतर मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्षात कामगारांना ऊस तोडणीचे काम न सांगता वेगळ्या कामाला लावण्यात आलं. मात्र उसतोडणीचे काम दिले जात नसल्याने या कामगारांनी ठेकेदाराला विचारणा केली असता दमदाटी करण्यात आली. 

कामगारांनी साधला हेल्पलाईनवर संपर्क 

तर सदरचा प्रकार लक्षात आल्यावर कामगारांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना दमदाटी तसेच धमकी देण्यात आली होती. यादरम्यान कामगारांनी पुन्हा गावी जाऊ नये म्हणून त्यांना गावातच डांबून ठेवण्यात आले होते. दरम्यान यातील काही कामगारांनी जनसहज फाउंडेशनच्या हेल्पलाइन नंबरवर घडल्या प्रकाराबाबत तक्रार केली होती. त्यानुसार जनसहज फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी तसेच पोलिसांचे मदत घेत सोडविण्याचे प्रयत्न केले. 

सर्व कामगारांना आणले गावी 

ठेकेदाराकडून ऊस तोडीचे काम सांगून कामगारांना नेण्यात आले. मात्र ते सोडून वेगळीच काम कामगारांना करायला भाग पाडल्याचे याठिकाणी सांगण्यात आले. यानंतर गावात पोहचत सर्व कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली. यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गावी आणले आहे. कामगारांना गावी आणल्यानंतर जिल्हाधिकारी तसेच विधी सेवा प्राधिकरण यांची भेट घेऊन त्यांना प्रकार कळविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT