Sarpanch Reservation : मावळातील निम्म्या ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज; १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निघाले आरक्षण

Maval News : राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणूका रखडलेल्या आहेत. या निवडणूक आगामी काळात होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वी ग्रामपंचातींवर सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यात येत आहे.
Sarpanch Reservation
Sarpanch ReservationSaam tv
Published On

मावळ : निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येत आहेत. त्यानुसार मावलमधील जवळपास १०३ ग्रामपंचायतींसाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये जवळपास निम्मे म्हणजे ५३ ग्रामपंचातींवर सरपंच पद महिलांसाठी आरक्षित निघाले आहे. हे आरक्षण पुढील पाच वर्षांसाठी कायम राहणार आहे. 

राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणूका रखडलेल्या आहेत. या निवडणूक आगामी काळात होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वी ग्रामपंचातींवर सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यात येत आहे. निवडणूक आगामी पाच वर्षांसाठी मावळमधील एकशे तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात काढण्यात आली. 

Sarpanch Reservation
Crime News : दुकानाची उधारी मागितल्याने गावात धुडगूस; हवेत गोळीबार करून दुकान, मोटारसायकलची तोडफोड

२०३० पर्यंत राहणार आरक्षण 

आरक्षण काढण्यात आलेल्या मावळातील ५३ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार आहे. मावळ तालुक्यात एकूण एकशे तीन ग्रामपंचायती असून त्यांच्या सरपंचपदासाठी ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० या कालावधीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील एकशे तीन ग्रामपंचायतींपैकी आदिवासी क्षेत्रातील १० ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी कायमस्वरूपी राखीव असून त्यांचा या सोडतीमध्ये समावेश नाही. 

Sarpanch Reservation
Dhule : कचरा घोटाळ्यासंदर्भात शरद पवार गट आक्रमक; आयुक्तांना दिले भ्रष्ट्राचार झाल्याचे पुरावे

उर्वरित ९३ ग्रामपंचायतीपैकी नऊ ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी, ६ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी, २५ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) तर ५३ ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी काढण्यात आले आहे. दोन विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठया टाकून आरक्षित करण्यात आल्या. सर्वसाधारण ५३ ग्रामपंचायतींमधून महिला व पुरुषांसाठी आरक्षण काढण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com