Silver Price Saam tv
महाराष्ट्र

Silver Price: चढउतारानंतर चांदीला पुन्‍हा चकाकी

चढउतारानंतर चांदीला पुन्‍हा चकाकी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मागील काही दिवसांपासून चांदी व सोनेच्‍या दरात चढउतार होत आहे. शिवाय, लग्‍नसराई बंद झाली असून सण उत्‍सव देखील नसल्‍याने हवी तशी मागणी दागिन्‍यांना नव्‍हती. यामुळे दर खाली– वर होत होते. मात्र आता सण उत्‍सवांना सुरवात होत असून या पाश्‍र्वभुमीवर चांदीच्‍या (Silver) दरात वाढ होण्याची शक्‍यता व्‍यावसायिकांकडून होत आहे. (Jalgaon News Today Silver Price)

रशिया - युक्रेन युद्धाचे (Russia Ukraine War) दुष्परिणाम कायम असले तरी फेस्टिव्हल सीझनमुळे चांदीच्या भावात चढ- उतार सुरू होते. सणासुदीच्या हंगामामुळे मौल्यवान धातूंच्या खरेदीला चालना मिळत आहे. दरम्‍यान सहा महिन्‍यांपुर्वी अर्थात ९ मार्चला चांदीच्‍या दराने उच्‍चांक गाठत ७३ हजार ५०० रुपये इतका दर सराफ (Jalgaon) बाजारात चांदीचा झाला होता. तर २७ जुलैला या वर्षात नीचांकी ५५ हजार ३०० रुपये किलोपर्यंत हे भाव घसरले होते. परंतु, आता चांदीचे दर वाढत असल्‍याने आज जळगावच्या सराफा बाजारात ५९ हजार रुपये किलोवर स्थिरावली आहे.

फेस्टिव्हल सिझन

दहा दिवसांपूर्वी चांदीचे भाव अस्थिर होते. सध्या हे भाव कमी झाले आहेत. आता सण उत्‍सवांचा महिना असलेल्‍या श्रावणात रक्षाबंधन यानंतर गौरी– गणपतीपासून सणांना सुरवात होईल. यामुळे चांदीच्‍या दागिन्‍यांची प्रामुख्‍याने मागणी होत असते. शिवाय आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि शेअर बाजाराचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरावर होत असतो. यामुळे सुरू होत असलेल्‍या उत्‍सवात सराफा बाजारात उलाढाल होईल असे सराफा व्यावसायिक यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT