Jalgaon Shiv Sena News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शिवसैनिक वाजत गाजत मालेगावला रवाना

उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शिवसैनिक वाजत गाजत मालेगावला रवाना

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शिवसेना पक्ष फुटीनंतर उत्तर महाराष्ट्रात प्रथमच मालेगावला उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे. या सभेसाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने मालेगाव (Malegaon) येथे रवाना झाले. ढोल वाजवत नाचत शिवसैनिकांनी (Jalgaon News)जोरदार घोषणाबाजी करत सभेसाठी प्रस्‍थान केले. (Maharashtra News)

उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथे होत असलेल्या सभेला उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून शिवसैनिक जात आहेत. यात जळगाव जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेले मोठ्या संख्येने शिवसैनिक मालेगाव येथे रवाना झाले आहेत. धरणगाव येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने मालेगावकडे रवाना झाले. यावेळी वाजत गाजत जोरदार घोषणाबाजी करत बस तसेच इतर वाहनांच्या माध्यमातून शिवसैनिक हे मालेगाव कडे रवाना झाले.

उद्धव ठाकरे हे आमचे दैवत

उद्धव ठाकरे हे आमचे विठ्ठल आहेत व विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठलाच्या वारीसाठी आम्ही मालेगावला (Shiv Sena) जात असल्याच्या भावना यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांनी बोलताना व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहे व आम्ही त्यांना सोडणार नाही; असेही यावेळी पदाधिकारी म्हणाले. तसेच या गद्दारांना जमिनीत काढण्यासाठी आम्ही मालेगावला जात असल्याचेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उमेदवार समरजीत घाटगे यांच्या फोटोच्या पॅम्पलेटवर करणी

VIDEO : महायुतीने घेतला कांद्याचा धसका! निर्यात शुल्कात पुन्हा कपात

Mayavati News : ...तर बहुजन समाज पक्ष सरकारमध्ये सामील होणार; माजी मुख्यमंत्री मायावतींनी मोठे संकेत

Shrigonda Vidhan Sabha : राहुल जगताप यांचे पक्षातून निलंबन; बंडखोरी केल्याने शरद पवार गटाची कारवाई

Vande Bharat food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये देण्यात आलेल्या सांबारात किडे तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, या ठिकाणी घडली घटना

SCROLL FOR NEXT