Ramdas Athawale: पवारांनी आता एनडीए सोबत यावं; मंत्री रामदास आठवले यांचे पवारांना निमंत्रण

पवारांनी आता एनडीए सोबत यावं; मंत्री रामदास आठवले यांचे पवारांना निमंत्रण
Ramdas Athawale Sharad Pawar
Ramdas Athawale Sharad PawarSaam tv

सांगली : शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध असून पंतप्रधान मोदींकडून पवारांचे अनेक वेळा कौतुक केले आहे. तसेच शरद पवारांनी (Sharad Pawar) कितीही विरोधी पक्षाला एकत्र करून आघाडीच्या बैठका घेतल्या, तरी २०२४ मध्ये पुन्हा एनडीएचे सत्ता येणार आहे. नागालँड प्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे असे निमंत्रण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पवार यांना दिले. (Tajya Batmya)

Ramdas Athawale Sharad Pawar
Accident News: लातूरात उड्डाणपुलावर अपघात; एका युवकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

रामदास आठवले हे सांगली येथे आले असता पत्रकार परिषदेत माध्‍यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यातल्या शिवसेनेच्या आणि सत्ता संघर्षाच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूनेच निकाल लागेल, असे मत देखील मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेले. पण बाळासाहेब ठाकरे असते तर उध्दव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. शिवसेना घालवण्यात (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे जबाबदार आहेत, असा आरोप देखील मंत्री आठवले यांनी केला आहे.

Ramdas Athawale Sharad Pawar
Accident News: भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

गांधींनी तोंड सांभाळून बोलावे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य असून राहुल गांधी हे कायद्या पेक्षा मोठे नाहीत. तसेच राहुल गांधी यांच्यावरील कारवाईमध्ये भाजपाचा संबंध नसून राहुल गांधींनी या आधी अनेक वेळा चुकीचे वक्तव्य केले आहेत. एकदा त्यांना माफी देखील मागावी लागली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आपले तोंड सांभाळून बोलले पाहिजे. तसेच मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसचा फायदा होत नाही आणि पक्ष वाढत नाही; असा टोला देखील लगावला आहे..

Ramdas Athawale Sharad Pawar
Dhule News: कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसले; आमदार कुणाल पाटील

राज ठाकरेंवरही निशाणा

मनसे नेते राज ठाकरे यांचावरही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. मुंबईचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस विकास करत असताना त्याला डान्सबार म्हणणं चुकीचं आहे. तसेच राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये. भोंगे काढण्या पेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील ते बघावे. भोंग्याना विरोध करू नये आणि राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा; असा टोला देखील लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com