Accident News: भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
Accident News
Accident NewsSaam tv

भंडारा : भरधाव ट्रेलर चालकाने दुचाकीवरील पोलिसाला चिरडल्याची घटना भंडारा (Bhandara) शहरातील त्रिमर्ती चौकात घडली. सरळ ट्रेलरच्या चाका खाली आल्याने चाकात दबुन पोलिस (Police) कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यु झाला आहे. (Latest Marathi News)

Accident News
Anil Gote: माल लगावं अन्‌ माल कमाव हाच यांचा धंदा; माजी आमदार अनिल गोटे यांची सरकारवर टीका

राजपुत मते (वय 56) असे मृतकाचे नाव आहे. पोलिस लाइन भंडारा येथील निवासी राजपूत मते हे लाखनी पोलिस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते. आज ते मार्केटमधून भाजी घेऊन आपल्या पोलिस (Police) लाइन येथे घरी दुचाकीने जात होते. याच दरम्‍यान अचानक भरधाव वेगाने येणारा ट्रेलर ट्रकने त्याला धड़क (Accident) दिली. धड़क इतकी जबर होती की सरळ चाकात येत चाकाखाली दबुन त्याच्या जागीच मृत्यु झाला.

Accident News
Accident News: लातूरात उड्डाणपुलावर अपघात; एका युवकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

घटनेच्या नंतर चौकात उपस्थित वाहतूक पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेत मृतकाचा मृतदेह शवविच्छेदना पाठविन्यात आला आहे. मृतक राजपूत मते याच्या मागे २ मूल, १ मुलगी, पत्नी, आई असा मोठा आप्त परिवार आहे. विशेष म्हणजे भंडारा शहरात २४ तासात अपघाती मृत्युची दूसरी घटना घड़ल्यांने शहरातील वाहतूक व्यवस्था किती धोकादायक ठरत आहे. याची प्रचिती येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com