महाराष्ट्र

काटेरी झुडपात बाळाचा रडण्याचा आवाज आला; शेतमजुरांनी पाहिले तर समोर आला धक्‍कादायक प्रकार

काटेरी झुडपात बाळाचा रडण्याचा आवाज आला; शेतमजुरांनी पाहिले तर समोर आला धक्‍कादायक प्रकार

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : सांगवी ते भालोद रस्त्यावरील एका शेताजवळ नवजात स्त्री जातीचे जीवंत अर्भक आढळून आले. या नवजात अर्भकाला सोडून अज्ञात मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-news-sangavi-bhalod-road-side-newborn-living-infant-of-the-female-species)

यावल तालुक्‍यातील सांगवी ते भालोद रस्त्यावरून शेतमजूर आज (१९ ऑक्टोबर) सकाळी शेतात जात होते. दरम्‍यान शेतात कामाला जात असतांना वाटेतील हरी बोरोले यांच्या शेताजवळ काटेरी झुडपात एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. यावेळी मजूरांनी पाहणी केली असता त्यांना नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. या घटनेमुळे यावल परिसरात खळबळ उडाली आहे.

उपचारार्थ नेले ग्रामीण रूग्णालयात

मजूरांनी तातडीने यावल पोलीसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नवजात बालकाला उचलून तातडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याप्रकरणी शेतमजूर महिला लक्ष्मी धनराज भिल (वय २६) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरूद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsAppवर Online न राहता करु शकता चॅटींग, वाचा ट्रिक्स

Jio VS Airtel: ३५९९ रुपयांचा प्लॅनमध्ये कोण देतं जास्त डेटा आणि फायदे, जाणून घ्या बेस्ट प्लॅन कोणता?

New Rules: कामाची बातमी! बँक, पेन्शन अन् आधारच्या नियमात बदल; तुम्हाला माहितच असायला हवे

Mumbai Kabutarkhana : मुंबईत 4 ठिकाणी कबुतरखान्यांना परवानगी, सकाळी 7 ते 9 या कालावधीतच दाणे टाकण्यास अनुमती | VIDEO

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

SCROLL FOR NEXT