Toilet scam Saam tv
महाराष्ट्र

टॉयलेट घोटाळा; चार संशयित गजाआड, मुख्‍य आरोपी फरारच

टॉयलेट घोटाळा; चार संशयित गजाआड, मुख्‍य आरोपी फरारच

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : स्वच्छ भारत अभियानाच्या दीड कोटी रुपयांच्या टॉयलेट घोटाळा रावेर पंचायत समितीत झाला होता. या घोटाळ्यातील ४ आरोपींना पोलिसांनी (Police) रात्री अटक केली. मुख्‍य आरोपी मात्र अद्याप फरार आहे. (jalgaon news raver panchayat samiti Toilet scam four suspects are absconding)

रावेर (Raver) पंचायत समितीत झालेल्‍या टॉयलेट घोटाळ्यातंर्गत तीन महिन्‍यांपुर्वी गुन्‍हा दाखल होता. परंतु, या घोटाळ्यातील आरोपी आतापर्यंत फरार होते. मात्र बुधवारी (६ जून) सायंकाळी उशिरा पोलिसांनी पंचायत समितीचे अकाउंटंट लक्ष्मण दयाराम पाटील, रवींद्र रामू रायपुरे व नजीर हबीब तडवी (रा. पाडळा बुद्रूक) व बाबूराव संपत पाटील (रा. विवरा बु.) या चौघांना अटक केली आहे. मुख्‍य आरोपी मात्र अद्याप फरार आहे. (Jalgaon News) पोलिस निरीक्षक कैलास नागरे, उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील वंजारी, विकारुद्दीन शेख, अमोल जाधव, सुकेश तडवी, सचिन घुगे, सुरेश मेढे आणि समाधान ठाकूर यांच्या पथकाने अटक केली.

चौघेही अपहाराचे लाभार्थी

अटक झालेले चौघेजण या घोटाळ्यातील अपहाराचे लाभार्थी आहेत. या चौघांच्या बँक (Bank) खात्यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अनुदानाची रक्कम वर्ग झाल्याचे आढळून आल्याने ही कारवाई केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल अडीच महिन्यानंतर ही पहिली कारवाई पोलिसांनी केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अनुदानाचा बेकायदेशीर लाभ घेतलेले सुमारे १२६ जण पोलिसांच्या कारवाईच्या टप्प्यात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची नांदेड पोलिसांनी काढली धिंड

Protein Deficiency: प्रोटीनची कमतरता असल्यास शरीर देतं 'असे' संकेत

Pune To Madgaon Torism: पुण्याहून मडगावला निघालात? वाचा रेल्वे, बस आणि फ्लाइटचे संपूर्ण माहिती

Belly Fat: बेली फॅट कमी करण्यासाठी पाणी किती प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Kalyan : कल्याण- डोंबिवलीतील त्या कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्टला मिळणार नियुक्ती पत्र; २७ गावातील कर्मचाऱ्यांच्या लढ्याला अखेर यश

SCROLL FOR NEXT