Ashadhi Wari: पंढरपूरसाठी थेट गावातून सुटल्‍या ७० बस

पंढरपूरसाठी थेट गावातून सुटल्‍या ७० बस
Ashadhi Wari, Pandharpur Wari 2022, Jalgaon News Ashadhi Wari, Pandharpur Palkhi 2022
Ashadhi Wari, Pandharpur Wari 2022, Jalgaon News Ashadhi Wari, Pandharpur Palkhi 2022Saam tv
Published On

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळातर्फे पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अनोखा उपक्रम राबविला जात आहे. पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी थेट गावातूनच पंढरपूरपर्यंत (Pandharpur) बससेवा पुरविली जात आहे. या अंतर्गत (Jalgaon) जळगाव विभागातून नियमित सेवेव्‍यतिरिक्‍त ७० बस सोडल्‍या आहेत. (jalgaon news Ashadhi Wari 70 buses departing from the village for Pandharpur)

Ashadhi Wari, Pandharpur Wari 2022, Jalgaon News Ashadhi Wari, Pandharpur Palkhi 2022
Crime News : नगराध्यक्षांच्या पतीसह सास-यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

आषाढी वारीला (Ashadhi Wari) विठुरायाच्या दर्शनाची आस भक्‍तांना असते. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) भाविकांना विठ्ठलाच्‍या दर्शनासाठी जाता आले नाही. मात्र, यंदा आषाढी वारी होत असल्‍याने भाविकांचा गर्दी अधिक आहे. या दृष्‍टीने गावागावातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी (St Bus) एसटी प्रशासनाने उत्तम उपक्रम राबवून दिलासा दिला आहे. त्यामुळे आता पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना थेट आपल्या गावातूनच पंढरपूरपर्यंत लालपरीतून सुखद प्रवास करता येणार आहे.

मागणीनंतर बस

पंढरपूर जाण्यासाठी गावातून भाविकांची मागणी झाल्‍यास थेट गावातून बस सोडली जात आहे. यानुसार जळगाव विभागातून जवळपास ७० बसची व्यवस्था एसटी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. भाविकांतर्फे मागणी वाढल्यास आणखी बस वाढविण्याचा निर्णयही घेण्यात येणार असल्‍याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले. (Pandharpur Wari 2022)

दिवसभरातून पाच बस

आषाढी वारी म्‍हटली म्‍हणजे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी अधिक असते. ही गर्दी लक्षात घेता जादा बसची व्यवस्था केली आहे. या जादा बस मागील आठवड्यापासून सोडल्‍या जात आहेत. मागणी होईल, त्‍यानुसार जळगाव विभागाच्‍या सर्वच आगारातून पंढरपूरसाठी जादा बसची सुविधा केली जात आहे. दिवसभरातून साधारण पाच जादा बस सोडल्‍या जात आहेत. यामुळे चार ते पाच महिने आंदोलनादरम्यान डबघाईला आलेल्या लालपरीला सुरळीत करण्यासाठी चांगलीच चालना मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com