Rojgar Hami Yojana Saam tv
महाराष्ट्र

‘रोहयो’ची मजूरसंख्या सात हजारांवरून अडीच हजारांवर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : ग्रामीण भागातील नागरिकांना काम मिळावे, त्यांना आपल्या गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयातर्फे ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ राबविली जाते. कोरोना (Corona) महामारीमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या काळात रोजगार हमी योजना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार मजुरांसाठी वरदान ठरली होती. कोरोनाचे निर्बंध हटताच ‘रोहयो’च्या मजूर संख्येतही घट झाली आहे. (jalgaon number of Rohyo laborers increased from seven thousand to two and a half thousand)

जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एकूण ८७३ कामे सुरू होती. त्याद्वारे साडेसात हजार मजूर कार्यरत होते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून मजुरांच्या संख्येत घट होताना दिसते. आता केवळ ३४९ कामे सुरू असून, त्यावर दोन हजार ५२४ मजूर कार्यरत आहेत. उन्हाचा तडाखा, कोरोना निर्बंध उठविल्याने इतर ठिकाणी मिळालेल्या रोजगाराच्या संधी यामुळे योजनेतील मजुरांच्या संख्येत घट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरवात झाली. पुढे जाऊन संसर्ग वाढल्याने टाळेबंदीचे पाऊल उचलावे लागले. सर्वच क्षेत्रांतील व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे अनेकांच्या हाताचे काम गेले.

अनेकांना रोजगार हमी योजनेने तारले

जळगाव जिल्ह्यात सुरवातीच्या काही दिवसांचा अपवाद वगळता रोजगार हमी योजनेची कामे नेहमीप्रमाणे सुरू राहिली. विशेष म्हणजे, उदरनिर्वाहासाठी शहरांमध्ये गेलेल्या ग्रामीण भागातील लोकांना टाळेबंदीमुळे गावाकडे परतावे लागले. अशा लोकांनाही रोजगार हमी योजनेने तारले. रस्त्यांची कामे, सार्वजनिक विहिरी, रोपवाटिका, वृक्षलागवड, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संरक्षक भिंती, विहीर, फळबाग लागवड, घरकुल, जनावरांचा गोठा यांचे बांधकाम, शोषखड्डेनिर्मिती यांसारख्या कामांचा समावेश होतो. जळगाव जिल्ह्यात विशेष बाब म्हणून रोजगार हमी योजनेच्या कामात रेशीम शेतीसाठी आवश्यक असलेली तुती लागवडीच्या कामाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

८७३ कामे सुरू

समावेश रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत माहिती देताना ‘रोहयो’चे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी जळगाव जिल्ह्यात आजरोजी रोजगार हमी योजनेची एकूण ८७३ कामे सुरू असून, त्यावर सात हजार ४०० मजूर कार्यरत आहेत. गेल्या वर्षभराचा विचार केला, तर डिसेंबरअखेरपर्यंत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १३ लाख २९ हजार ६९४ मनुष्य दिवसांची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरूपाची कामे उपलब्ध करून दिली जातात. त्यात प्रत्येक मजुराला एका दिवसाला जास्तीत जास्त २३८ रुपये मजुरी मिळत होती. आता त्यात वाढ होऊन २५६ रुपये मजुरी मिळते आहे.

कडक उन्‍हाचा परिणाम

गत वर्षी जळगाव जिल्ह्यातील एक हजार १८३ ग्रामपंचायतींपैकी ३५३ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची ८७३ कामे झाली. मजुरांची संख्याही साडेसात हजारांवर होती. सध्या कोरोनाचे निर्बंध उठले आहेत. खासगी क्षेत्रात, शेतकऱ्यांकडे मजुरांना चांगली मजुरी मिळते. यामुळे मजुरांची कमी झाली. कडक उन्हामुळे मजुरांना कामे करताना अडचणी येतात. यामुळेही मजूरसंख्या रोडावली. सध्या चाळीसगाव येथे ७९, चोपडा- २२, जामनेर- ७९, रावेर- ३५ अशा एकूण २२८ ठिकाणी ३४९ कामे सुरू असून, मजूरसंख्या दोन हजार ५२४ आहे, अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT